Home Loan | प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतात. काही स्वप्न असतात. अगदी आपण लहान मुलाला जरी विचारले की, त्याची इच्छा काय आहे? तर तो अजिबात विचार न करता त्याच्या दहा-बारा इच्छा सहज सांगून टाकीन. परंतु ही स्वप्न जेवढी बघायची असतात तेवढी पूर्ण देखील करायची असतात. प्रत्येकाच्या स्वप्नांची यादी ही वेगवेगळी असते. परंतु त्या स्वप्नांच्या यादीतील एक गोष्ट मात्र सगळ्यांची सारखी असते. ती म्हणजे स्वतःच घर घेणे. स्वतःच घर घ्यायचे हे अनेकांचे स्वप्न असतं. परंतु आजकाल वाढती महागाई त्याचप्रमाणे घरांचे भाव पाहता अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही.
अनेक लोक आपल्या घर गाव सोडून शहरांमध्ये नोकरी करायला जातात. आणि तिथे जाऊन स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न बघत असतात. परंतु त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अजिबात स्वस्त नसते. सध्या देशातील अशा अनेक बँका आहेत. ज्यांनी घर खरेदीसाठी गृह कर्जाची (Home Loan) सुविधा देखील लोकांना दिलेली आहे. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी खूप कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुम्हाला घर खरेदी करायचे असेल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
8. 50 टक्के दराने गृह कर्ज | Home Loan
स्टेट बँक ऑफ इंडिया ही तुम्हाला गृह कर्जाची पात्रता तपासण्यासाठी YONO ॲप देत आहे. या YONO ऍपद्वारे तुम्ही अर्ज करण्याचा सर्वात सोपा मार्ग जाणून घेऊ शकता. यावर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्या देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना सुरुवातीला 8.50% दराने गृह कर्ज देते. आता या YONO युनो ॲपवर तुमची ग्रह कर्जासाठी पात्रता कशी तपासायची? याची सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
गृहकर्ज पात्रता तपासण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पद्धत
- तुमच्या मोबाइल फोनमध्ये योनो ॲप उघडा आणि मेनूवर जा आणि कर्जावर क्लिक करा.
- आता तुम्हाला होम लोनवर क्लिक करावे लागेल.
- पुढील चरणात तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल.
- आता तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल की तुम्ही नोकरी किंवा व्यवसायातून पैसे कमावता.
- पुढे तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल.
- तुमच्याकडे आधीच कर्ज असल्यास, तुम्हाला सध्याच्या कर्जाची माहिती द्यावी लागेल.
- तुम्ही ही सर्व माहिती देताच, तुमच्या स्क्रीनवर आवश्यक माहितीसह गृहकर्ज अर्जाची पात्रता दिसेल.
- आता तुम्हाला I am Interested वर क्लिक करावे लागेल.
- पुढील चरणात तुम्हाला सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील आणि सबमिट वर क्लिक करा.
- हे केल्यानंतर, तुमचा ऑनलाइन अर्ज दाखल केला जाईल, त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर बँकेकडून कॉल येईल.