Wednesday, March 29, 2023

कोल्हापूरात होम क्वारंटाईन असताना फिरणे पडले महागात, न्यायालयाने महिन्याची सुनावली शिक्षा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/ प्रतिनिधी- आरोग्य विभागाने हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन केले असताना सुद्धा समाजात फिरणे, संसर्ग पसरविणे व लॉक डाऊन व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग केल्या प्रकरणी शिरोळ इथल्या धरणगुत्ती गावातील निखिल मोहन कळशे आणि गणेश आप्पासो कुंभार या दोघांना जयसिंगपूर न्यायालयाने एक महिण्याचा सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची कोल्हापूर सब जेल मध्ये रवाणगी करण्यात आली.

राज्य आणि केंद्र शासनाने लागू केलेल्या कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिक्षा होणारी महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. कळशे व कुंभार यांना मार्च महिण्यामध्ये होम क्वारंटाईन केले होते. कळशे याचा पुणे शहराशी संपर्क आला होता. तर कुंभार याला खोकला लागला होता. नागरीकांच्या तक्रारी वरून अनेक वेळा समज देऊन सुद्धा कायद्याचा भंग केला म्हणून शिरोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना आयसोलेट केले होते.

- Advertisement -

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.