पाय मुरगळला असेल तर करा ‘हे’ घरगुती उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा चालताना पाय मुरगळतो. काही वेळेला पाय घसरल्याने, पायाखाली कोणती वस्तू आल्यानंतर, टाकताना पाय जर उलटा पडला ,अशी अनेक कारणे पाय मुरघळण्याची आहेत. पाय मुरगळणं ही खूप सामान्य अशी समस्या आहे. पण पाय मुरगळल्यावर मात्र ते सामान्य वाटत नाही कारण हे दुखणं असह्य असंच असतं. आणि चालताना सुद्धा जास्त त्रास होतो. अनेक वेळा व्यायाम करताना अशी काही चूक, एखादी छोटी मोठी दुर्घटना आपल्याकडून चुकून होते. पाय मुरघळणे हे कधी कधी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. याकडे जर वेळीच लक्ष नाही दिले तर अनेक समस्या निर्माण होतात.

पाय दुखणे किंवा मुरघळणे हे दुखणं मोठे आणि आपल्या सहनशक्तीच्या पलीकडचं असतं तेव्हा अगदी लगेच डॉक्टर ना दाखवावं. हलगर्जी पणा करू नये. काही प्रमाणात हा आजार जर सौम्य असेल तर मात्र घरगुती पद्धतीने त्यावर उपाय करू शकता. असे कोणते घरगुती उपाय आहेत त्याचा वापर आपल्या पायांसाठी करू शकतो जाणुन घेऊया….

बर्फाने पाय शेका—-

पाय मुरगळल्या नंतर त्या ठिकाणी बर्फाने शेक दिला तर सूज कमी व्हायला मद्त होते. एका कपड़ामध्ये बर्फ बांधून दर १ ते २ तासांनंतर शेक देत रहावा. एका वेळी सलग १० ते १५ मिनिट शेक दिला जाणं गरजेचं आहे.

आराम—

पाय मुरगळल्यावर मुरगळलेल्या भागाला आराम देणं, हा दुखापत भरून काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय. कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नये. जास्त हालचाल केल्यास आपल्या पायांना वेदना होण्यास सुरुवात होते.

बँडेज लावावे—-

ज्या भागात सूज आहे त्या भागाला सोडून दुखऱ्या जागेवर बँडेज बांधणे गरजेचे असते. सूज कमी करण्यासाठी दुखऱ्या जागेवर इलॅस्टिक बँडेज बांधावे.

उंच ठिकाणी पाय ठेवणे—

पाय मुरगळला असता तो उंच भागावर असेल अशा प्रकारे झोपावे. बसलेले असताना पाय उंचावर राहील अशा प्रकारे फुटरेस्ट किंवा स्टुलवर उशी ठेऊन त्यावर ठेवावा. म्हणजे त्यातील रक्ताभिसरण क्रिया होण्यास मदत होऊ शकते.

हळदीचा लेप—-

पाय जास्त प्रमाणात सुजला असेल तर त्यावर हळदीचा लेप लावा . म्हणजे त्याने सूज आणि वेदना कमी करायला उपयोगी ठरतो. तसेच दररोज कमीत कमी दोन वेळा हळदीचा लेप लावला जावा.

लावंगाचे तेल—

लवंगाच्या तेलात ऍनास्थेटीक गुण असतात. त्यामुळे हे नैसर्गिक पेन-किलर सूज कमी करून दुखण्यापासून आराम देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment