तेलकट चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक मुलीना आपण सुंदर दिसावे असे वाटत त्यासाठी त्या प्रत्येकजणी विशेष प्रयत्न करत असतात. पण प्रत्येकवेळेला त्याचा री चांगलाच परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर दिसेल असे नाही. प्रत्येकाच्या चेहरा हा वेगळा असतो कोणाच्या चेहऱ्याची त्वचा हि तेलकट असते तर कोणाच्या चेहऱ्याची त्वचा हि कोरडी पण असू शकते त्यामुळे आपल्या चेहऱ्याला आणि त्याच्या त्वचेला ज्या प्रकारचे प्रॉडक्ट सूट होतील असेच प्रॉडक्ट वापरावेत . तेलकट चेहरा असणे हि सर्वात मोठी समस्या आहेत. त्यापासून दूर राहण्यासाठी घरगुती कोणत्या पद्धतीचं वापर करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया …
कारणे —

— तेलकट चेहऱ्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.

— तेलकट चेहऱ्यामुळे तोंडावर पिंपल्स येण्याच्या समस्या निर्माण होतात.

— आपल्या त्वचेवर ‘सिबम’ नावाचा एक थर असतो. त्यामुळे आपला चेहरा हा तेलकट बनतो. थरामुळे केसांना चकाकी येते आणि आपले केस कमी गळू लागतात.
— तेलकट त्वचेवर अनेक धुळीचे कण लगेच साठतात. त्यामुळे त्वचा हि दिसण्यास खराब दिसते.

उपाय —

— चेहरा वारंवार धुवा पण चेहरा धुताना कोणत्याही साबणाचा वापर करू नये.

— नेहमी स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. हे आपण बऱ्याचदा करायला विसरतो.

— दिवसातून कमीत कमी चार वेळा साध्या थंड पाण्याने चेहरा धुवून सुती कापडाने टिपून घेत राहिल्याने चेहऱ्यावरचे तेल निघून जाते आणि त्यावर मग धुळीचे आणि प्रदूषणाचे कण चिकटून बसत नाहीत. त्यामुळे चेहरा खराब दिसणार नाही.

— सकाळी किंवा संध्याकाळी झोपताना चेहरा हा थंड पाण्याने धुवा . चेहरा धुवून झाल्यावर त्यावर गुलाबपाणी कापसाच्या घ्या.

— प्रवासाला जाताना आपल्या सोबत टिश्यू पेपर ठेवा आणि त्याने चेहऱ्यावर जमा झालेले तेल टिपून घेतले तरी चालते.

— मध हे आरोग्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे. प्रमाणात मध घेऊन त्याचा वापर जर चेहऱ्यासाठी केला असता. तेलकट पणा निघून जातो.

— दहा मिनिटांनी चेहऱ्यावरचा मधाचा थर कोरडा झाला की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. किंवा थंड पाणी वापर. मधामुळे चेहऱ्यावर बॅक्टरीयाची वाढ होत नाही.

— ओट्सची पेस्ट दह्यात किंवा पपईच्या गरात कालवून घरगुती फेसपॅक सुद्धा करता येते. हे मिश्रण कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवून ते धुवा.

— बदामामुळे चेहऱ्यावरच्या डेड स्किन सेल्स, धुळीचे कण आणि इतर घाण निघून जाते. त्यामुळे बदामाचा स्क्रब पण चेहऱ्यावर वापरू शकता.

— कोरफड हि सर्व आजारांवर रामबाण उपाय आहे.

— टोमॅटो मधले ऍसिड त्वचेवरचे जास्तीचे तेल शोषून घेते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment