तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपले दात जर पिवळे असतील तर आपल्या व्यक्तिमहत्वात लगेच फरक पडायला सुरुवात होते. आपण ज्यावेळी चार लोकांच्यात बसायला जातो त्यावेळी बोलताना नेमके आपले दात दिसतात. आणि ते जर पिवळे पडले असतील तर समोरच्याच्या मनात आपल्या विषयी नकारात्मकता निर्माण होते. आपल्याला पण इतरांशी बोलताना अनेक वेळा गिल्टी वाईटाला लागते. कोणाशी आपला चागल्या पद्धतीचा संवाद साधू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या दातावर पिवळा थर ना येण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.

दातांना पिवळे पणा का येतो ?

— दातांना पिवळेपणा हा येण्यापाठीमागे आपले वय कारणीभूत असते.

— जरा जास्त प्रमाणात आपल्या आहारात दूध , चहा , कॉफी याचे प्रमाण जास्त असेल तर त्यावेळीस आपले दात पिवळे पडायला सुरुवात होते.

— तंबाखू खाणे हे शुद्ध दात पिवळे पाडण्यापाठीमागे महत्वाचे कारण आहे. जास्त अल्कोहोलिक पदार्थ याचा वापर जर केला तर सुद्धा आपले दात पिवळे पडतात.

— दररोज दातांची स्वच्छता केली नाही तर सुद्धा दात पिवळे पडू शकतात.

— जर आपल्या खाण्यात चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ आल्यानंतर दात पिवळे पडतात. त्यामुळे अप्लाय हसण्यावर मर्यादा असतात.

— बाजरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर जर दातांसाठी केला तर मात्र दात पिवळे पडतात.

कोणते उपाय आहेत ?

— दात स्वच्छ करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते.

— बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा नैसर्गिक रित्त्या व्हाईटनिंग साठी वापरला जाणारा घटक आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची टूथ पेस्ट वापरत असताना बेकिंग सोडा असलेली टूथपेस्ट वापरा. त्यामुळे तोंडातली बॅक्टरीया याची वाढ कमी प्रमाणात होते.

— बेकिंग सोडा आणि स्ट्रॉबेरी

दात स्वच्छ आणि पांढरे दिसण्यासाठी बेकिंग सोडा आणि स्ट्रॉबेरी वापर याने दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. दात पांढरे शुभ्र करण्याचा नैसर्गिक आणि घरगुती उपाय बऱ्याच सेलिब्रिटींकडून सुद्धा वापरला जातो. स्ट्रॉबेरी या फळामध्ये मॉलीक ऍसिड असते. त्यामुळे त्याचा वापर दात पांढरे करण्यासाठी केला जातो. दात पांढरे होण्यासाठी ते ऍसिड लाभकारक आहे.

— अननस

अननसामध्ये असणारे ब्रोमेलाईन नावाचे एक एन्झाईम दातांवरील डाग आणि पिवळा थर काढण्यासाठी परिणामकारक असते. त्यामुळे दात पांढरे होण्यासाठी मदत होते.

— हळद आणि मोहरी तेल

हळद पावडर आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण दातांवर घासल्याने दाताचा पिवळेपणा कमी होतो. आणि नष्ट करण्यास मदत होते. यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा मोहरी तेल घेवून ते मिश्रण तयार करा.

— मीठ

मिठाचा वापर हा दात पेस्ट घासतो तसे घासले तर फायदा होतो.

You might also like