Teeth Whitening : पिवळ्या दातांमुळे चारचौघात हसणंही झालंय मुश्किल? ‘हे’ घरगुती उपाय करुन पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या शरीरातील सर्व अवयवांची खूप काळजी घेत असतो. Teeth Whitening शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असलेल्या पांढऱ्याशुभ्र दातांची काळजी गेले जास्त गरजेचे असते. कारण ज्यावेळी आपण हसतो तेव्हा त्यातून आपले दात दिसत असतात. त्याची नीट स्वच्छता आपण राखली नाही तर ते पिवळे पडतात. आणि पिवळ्या दातांमुळे चारचौघात आपलयाला हसणंही मुश्किल बनून जाते. हे टाळायचे असेल तर काही घरगुती उपाय केल्यास त्यातून आपल्याला आपले दात सहज पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत होईल.

आपल्याला घरगुती पद्धतीने उपाय करायचा असेल तर त्यासाठी काही फळांचा आणि मसाल्यातील पदार्थाचा उपयोग करावा लागतो. त्यांचे अर्क फायदे जसे आहेत तसे त्याच्या दातांच्या स्वच्छतेसाठीही खूप फायदे आहेत. ते आता आपण जाऊन घेऊया…

Ginger Paste

आल्याची पेस्ट –

आपले पिवळे दात पांढरे शुभ्र करण्यासाठी आले या पदार्थांचाही चांगला उपयोग होऊ शकतो. तो म्हणजे आल्याचे लहान लहान तुकडे करून ते मिक्सर घालून बारीक करावे. त्यानंतर त्यात 1/4 चमचे मीठ मिसळावे. त्यात लिंबाचा रसही मिसळल्यानंतर या तिन्ही गोष्टीं एकजीव करून घ्याव्यात.  त्यातून तयार झालेले मिश्रण टूथब्रशने दातांवर घासावे. हे केलतंस दात पांढरे होण्यास मदत होते.

Cocoa Powder 01

 

कोको पावडरची पेस्टही उपयुक्त (Teeth Whitening)

दाताचा पांढरेशुभ्रपणा आणण्याबरोबरच त्याची चमक वाढवायची असेल ते कोको पावडर खूप उपयोगी ठरू शकते. यासाठील कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवावी. त्यानंतर ती ब्रशवर लावून दात स्वच्छ करावेत. या मिश्रणाच्या वापराने दातांची चमक पुन्हा येण्यास मदत होईल.

Neem leaf juiceकडुलिंबाच्या पानांचा रस

सर्वात आयुर्वेदिक कोणती वनस्पती असेल तर ती कडुलिंब हि होय. याचे औषधी गुणधर्म सर्वांना माहिती आहेत. स्वच्छ दातासाठी कडुलिंबाची पाने व त्याचा रस अधिक गुणकारी ठरतो. हा रहा तयार करण्यासाठी सुरुवातीला कडुनिबांची पाने एका भांड्यात ठेवून गरम पाण्यात उकळावीत. त्यानंतर पाणी काढून ती थंड होण्याची वाट पाहावी. आता या पाण्याने गुळण्या करावयात. कडुलिंबाच्या कडूपणामुळे तोंड आणि दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होण्यास मदत होते.

Strawberries

स्ट्रॉबेरी –

दातांच्या आरोग्यासाठी आणि पांढऱ्या शुभ्रतेसाठी स्ट्रॉबेरी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. या फ्लॅट एस्कॉर्बिक अ‍ॅसिड आढळते, जे दात चमकदार बनवण्यासाठी प्रभावी ठरते. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर पॉलिफेनॉलचा समावेश असतो. जे तोंडात बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करतात.

पिवळ्या दातांसाठी ‘या’ गोष्टी टाळा –

आपले जर दात पिवळे असतील तर ते तशा प्रकारे होऊ नये यासाठी काही गोष्टी आपण टाळणे आवश्यक आहेत. दातांना कीड लागू नये म्हणून कॉफी, लोणची, टॉफी आणि गोड पदार्थांचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच, वाइन किंवा अल्कोहोल पिणे टाळावे. कारण दारू पिल्याने दात पिवळे होतात.

हे पण वाचा –

आता हिवाळ्यात वाढणाऱ्या तुमच्या वजनाला करा नियंत्रित….

झाडांना कीटक आणि रोगांपासून वाचविण्यासाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशके 

हार्ट अटॅक आला तर तात्काळ करा 5 कामे, वाचवू शकता रुग्णाचा जीव 

दुधात तुळशीचे पान उकळल्याने होतात जबरदस्त फायदे

रोजच्या आहारातील वेलचीचे आहेत हे औषधी गुणधर्म