Home Remedies अनेक लोकांना पचनाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यापैकी पोटात गॅस तयार होणे ही एक समस्या अनेकांना होत असते. परंतु हा गॅस जर पोटात जास्त प्रमाणात तयार होत असेल, तर त्यामुळे पोटात सूज तयार होते आणि वेदना देखील होतात. तुमच्या जर खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या असतील, तर त्यामुळे ही समस्या उद्भवते. तुम्ही जर जेवणामध्ये जास्त सोडा खात असाल, धूम्रपान करणे, जेवताना बोलणे किंवा खूप लवकर जेवणे यामुळे देखील गॅसचा त्रास उद्भवू शकतो.
त्याचप्रमाणे ब्रोकोली, राजमा तसेच संपूर्ण धान्य इत्यादी फायबरयुक्त पदार्थांमुळे देखील पोटात गॅसची (Home Remedies) निर्मिती होते. काही लोकांना तर दूध, दही आणि चीजमुळे देखील गॅसची निर्मिती होते. त्यामुळे त्यांचे सेवन नियंत्रित करणे गरजेचे आहे. तुमच्या अन्नाचे पचन जर नीट झाले नाही, तर तुमच्या पचन संस्थेमध्ये एक वायू अडकतो. आणि त्याचा पचनसंस्थेवर दाब पडतो. गॅसच्या समस्यामुळे पोटदुखीचा देखील त्रास होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
आतड्यांची हालचाल करणे | Home Remedies
एका जागेवर बसून आतड्यांची हालचाल केल्याने आतड्यासंबंधी स्नायूंना झटकन टाकते. त्यामुळे पचनसंस्थेतून वायू बाहेर पडण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे गॅसला देखील बाहेर पडण्यासाठी जागा मिळते.
सफरचंद विनेगर
गॅस ब्लोटिंग आणि अपचन या समस्यांपासून सुटका मिळवण्याचा हा एक सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा सफरचंदाचा विनेगर टाका. आणि जेव्हा गॅस असेल तेव्हा त्याचे सेवन करा.
बडीशेप खाणे
तुम्ही बडीशेप चावून न खाता जर तुमच्या लाळेमध्ये चघळून खाल्ली, तर त्यामुळे गॅस पासून होणाऱ्या वेदना कमी होतात आणि तुमच्या पोटातील गॅस देखील कमी होतो.
पोटाला मालिश करणे
तुम्ही जर हलक्या हाताने पोटाला गोलाकार मसाज केला. तर पोटातील वायू निघून जाण्यास मदत होते. आणि तुम्हाला आराम देखील मिळतो.
फेरफटका मारणे
तुमच्या शरीराची जेवढी जास्त हालचाल असेल, तेवढा तुमच्या शरीरातील तयार झालेला वायू बाहेर निघून जाण्यास मदत होते. तुमच्या पोटाच्या स्नायूंना देखील आराम मिळतो. त्यामुळे शरीराची हालचाल करणे खूप गरजेचे असते.
योगासन करणे
बालासन, आनंद बालासन ही अशी योगासने आहे. ज्यामुळे गॅसपासून आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही ही योगासने देखील केली पाहिजे.