हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Workout) फिट आणि फाईन राहण्यासाठी उत्तम आहार व नियमित व्यायाम गरजेचा आहे. कारण, शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर चांगल्या सवयी नेहमी मदत करतात. पण घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्यात दैनंदिन वेळापत्रक इतकं पक्कं असतं की, बऱ्याचदा बाहेर जाऊन जिममध्ये किंवा योगा क्लासमध्ये व्यायाम करायला वेळ मिळत नाही. मग अशावेळी बरेच लोक घरच्या घरी वर्कआउट करतात. खरंतर, व्यायाम हा तज्ञांच्या देखरेखीत करणे कधीही फायदेशीर. कारण अनेकदा तज्ञांच्या अनुपस्थित केला जाणारा व्यायाम नुकसानदायी ठरू शकतो.
बऱ्याचदा घरी व्यायाम करताना दुखापतदेखील होण्याची शक्यता असते. शिवाय चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास हवा तसा फायदाही मिळत नाही. उलट शारीरिक वेदना आणि दुखापतींमध्ये भर पडते. (Home Workout) पण तरीही तुम्ही जर घरच्या घरीच व्यायाम करणे पसंत करत असाल तर काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. जेणेकरून तुम्हाला दुखापत टाळता येईल. चला याविषयी जाणून घेऊया.
1. व्यायामासाठी मॅटचा वापर
घरीच व्यायाम करताना सुरक्षितता कसली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, घरात तज्ञांशिवाय व्यायाम करताना दुखापती होऊ शकतात. त्यामुळे तुम्हालाच तुमच्या सुरक्षेची काळजी घ्यायाला हवी. (Home Workout) व्यायामासाठी क्रॅश मॅट, योगा मॅट किंवा फोमचा वापर करा. आसपास खूप सामान असणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला दुखापत होणार नाही.
2. वॉर्मअप टाळू नका
घरच्या घरी व्यायाम करत असलात तरीही वॉर्मअप करणे टाळू नका. (Home Workout) कारण व्यायामाने आपल्या स्नायूंवर परिणाम होत असतो. अशावेळी वॉर्मअप न करता व्यायाम करण्यास सुरवात केल्याने आपल्या स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता असते. वॉर्मअपमूळे स्नायू मोकळे होतात आणि व्यायामाचा उत्तम लाभ मिळतो. त्यामुळे वॉर्मअप टाळू नका.
3. सोप्या व्यायामाची निवड (Home Workout)
जर तुम्ही घरी वर्कआउट करत असाल आणि तुम्ही नव्याने व्यायामाला सुरुवात करणार असाल तर आधी सोप्या व्यायाम प्रकारांची निवड करा. जेणेकरून शरीराला थोड्या थोड्या व्यायामाची सवय होईल आणि त्यामुळे वेदना होणार नाहीत. असे केल्यास शरीर लवचिक होण्यासदेखील मदत मिळेल.
4. सतत एकच व्यायाम नको
बऱ्याचवेळा एखादा व्यायाम करताना आपण बराच वेळ तेच तेच करत राहतो. यामुळे शरीरातील उर्वरित स्नायूंना दुर्लक्षित केले जाते. ज्यामुळे फिटनेस बॅलन्स तयार होत नाही. (Home Workout) त्यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करताना प्रत्येक स्नायूंसाठी व्यायाम करा.
5. ब्रेकसुद्धा घ्या
व्यायाम करताना नॉनस्टॉप व्यायाम करायला हवा असे नाही. त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने आपल्या स्नायूंना रिकव्हर होण्यासाठी वेळ द्या. सतत व्यायाम केल्याने स्नायू थकतात. ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. (Home Workout) म्हणून व्यायाम करताना अध्येमध्ये ब्रेक घ्या.