पोटदुखीवर करण्यात येणारे घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पोटदुखी हि समस्या जरी सर्वसामान्य वाटत असले तरी त्याचा शारीरिक त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. अपचनामुळे गॅस, पोटदुखी, ऍसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे थकवा जाणवतो. पोटदुखी साठी घरगुती कोणकोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया

— एक चमचा गरम पाणी घ्या त्यामध्ये काही प्रमाणात मीठ टाका. मीठ हे पूर्णतः विरघळल्यानंतर ते पाणी प्या. तुमच्या पोटाला लगेच आराम मिळेल.

— काही प्रमाणात मेथीचे दाणे भाजून त्याचे पावडर तयार करा. त्यानंतर ती पावडर गरम पाण्यात टाकून त्याचे पाणी पिले जावे.

— एक ग्लास भर लिंबाचा रस तयार करून त्यामध्ये काही प्रमाणात काळे मीठ टाकावे , त्यानंतर सकाळ संध्याकाळ दररोज तेरस प्यावे.

— काही प्रमाणात वेलची पावडर तयार करून ती मधासोबत खावी.

— डाळिंबीच्या दाण्यांमध्ये काही प्रमाणात काळे मीठ आणि मिरे पावडर टाकून घ्यावेत .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment