Homemade Sunscreen | घरच्या घरी ‘हे’ पदार्थ वापरून करा नैसर्गिक सनस्क्रीन तयार, केमिकलपासून त्वचेचा करा बचाव

Homemade Sunscreen
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Homemade Sunscreen | उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. ऊन जरी वाढले तरी लोकांना कामासाठी बाहेर जावे लागते. यामुळे त्यांच्या त्वचेला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचते. अनेकांची त्वचा सनटॅन किंवा सनबर्निंग होत असते. आता एप्रिल आणि मे महिना येईल तसतसे तापमान वाढत जाईल. तुमच्या त्वचेला सनबर्नचा धोका देखील वाढत जाईल. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या त्वचेचे रक्षण करणे आणि उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे हे गरजेचे आहे. सध्या बाजारात अनेक सनस्क्रीन (Homemade Sunscreen ) उपलब्ध आहे. जे तुमच्या त्वचेचे संरक्षण करतात. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेची नुकसान कमी होते. परंतु या सगळ्या सनस्क्रीनमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असते. ते त्वचेसाठी देखील हानिकारक असते. त्यामुळे तुम्ही आता घरच्या घरी काही गोष्टी वापरून असे काही प्रॉडक्ट करू शकता ज्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.

त्वचेचे संरक्षण कसे करायचे ?

ज्यांना बाहेर जावे लागते त्यांनी बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही घरात असता, तेव्हा देखील तुमच्या त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे या काळात तुम्ही नैसर्गिक सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. जेणेकरून त्वचेवर रसायनांचा प्रभाव कमी होईल आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण देखील होईल. आता आम्ही तुम्हाला नैसर्गिक सनस्क्रीनबद्दल सांगणार आहोत जे कसे बनवायचे हे देखील आपण जाणून घेऊ.

या घरगुती घटकांपासून बनवू शकता नैसर्गिक सनस्क्रीन | Homemade Sunscreen

दूध आणि लिंबाचा रस

दूध आणि लिंबू हे सनटॅनिगसाठी खूप उपयोगी आहे. दूध तुमच्या त्वचेवर टॅनिंग रिवर्स करते. जे तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांपासून वाचवते. त्याचप्रमाणे तुमच्या त्वचेची चमक देखील कायम राहते. एवढेच नाही तर कच्चे दूध तुमच्या त्वचेवर लावल्यास तुम्हाला उन्हापासून देखील आराम मिळतो. लिंबाच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर रंगद्रव्य चांगल्या प्रकारे राहते. दोन चमचे कच्च्या दुधात एक चमचा लिंबू मिसळून ते मिक्स करा आणि एका कापसाने त्वचेवर नीट लावा याने तुम्हाला खूप फायदा होईल.

कोरफड आणि झिंक लोशन | Homemade Sunscreen

कोरफडचा वापर करून देखील तुम्ही सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकता. ते अल्ट्राव्हायोलेट किरणांना सुमारे 20% ब्लॉक करते. त्याचप्रमाणे झिंक ऑक्साईड देखील सूर्याच्या किरणांना तुमच्या त्वचेपासून दूर ठेवतो. तुमच्या जवळच्या कोणत्याही केमिस्टच्या दुकानात तुम्हाला झिंक ऑक्साईड मिळेल. एक चमचा एलोवेरा जेल त्याचप्रमाणे अर्धा चमचा जोजोबा तेल आणि पाणी एकत्र करून लोशन तयार करा आणि त्यात एसपीएफ जोडण्यासाठी तीन चमचे झिंक ऑक्साईड पावडर घाला. हे नीट मिसळून घ्या या तुम्ही विटामिन ईची कॅप्सूल देखील टाकू शकता आणि हे तुमच्या चेहऱ्यावर लावा.

कोरफड आणि ग्लिसरीन

कोरफड जेल आणि ग्लिसरीन हा एक चांगला सनस्क्रीन फॉर्म्युला आहे. तुम्ही तुमच्या घरात देखील हे सनस्क्रीन लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला खूप चांगला फायदा येतो. दमट वातावरणातही त्वचा मऊ राहते. एक बॉटल स्प्रेमध्ये तुम्ही कोरफड जेल, गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून मिसळून त्याचे सनस्क्रीन तयार करा आणि ते तुमचा चेहरा, मान आणि हाताला नियमितपणे लावा. जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल.