हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षेत असलेली होंडा कंपनीने 2023 लिवो बाईक भारतात लॉन्च केली आहे. या (2023 Livo) लिवो बाईकची एक्स -शोरूम किंमत 78,500 रुपये इतकी आहे. या बाईकला एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यात डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 82,500 रुपये आहे. सध्या ही बाईक चांगलीच चर्चेत आली आहे. या बाईकमध्ये देण्यात आलेले नवीन फीचर्स ग्राहकांच्या पसंदीत पडत आहेत. त्यामुळे 2023 Livo मोठी मागणी होत आहे.
Honda Livo विषयी माहिती
Honda Livo च्या अपडेटेड व्हर्जनवर दहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. नवीन ग्राफिक्स, अॅडव्हान्स आणि रिडिझाइन्ड केलेले फ्रंट व्हिझर अशा बऱ्याच गोष्टी 2023 Livo मध्ये बदल्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ब्लू मेटॅलिक, मॅट क्रस्ट मेटॅलिक आणि ब्लॅक अशा तीन कलर मध्ये Livo bike उपलब्ध आहे. होंडाने Livo ला ‘अर्बन स्टाईल’ देण्यासाठी हे नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर्ससह 18-इंच अलॉय व्हील, एक DC हॅलोजन हेडलॅम्प, 657 मिमी उंच सीट, इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, 5-स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल रीअर शॉक ऍब्जॉर्बर्स, RSU टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहे.
नविन फिचर्स
होंडा कंपनीने या नवीन व्हर्जनमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स दिले आहेत. पॉवरसाठी 109.51cc सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन बाईकमध्ये बसवण्यात आले आहे. जे 8.67 bhp पॉवर आणि 9.30 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनला सुरू करण्यासाठी ACG स्टार्टर देण्यात आला आहे. हे स्टार्टर ब्रशलेस मोटर जनरेटर म्हणून ही काम करते. दरम्यान, Livo ला 2015 मध्ये लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून या बाइकला चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे आता यावर्षी Livo चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे.