हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक चार्जिंगवरील बाईक व कार तयार करण्यात आलेल्या आहेत. तसेच भविष्यात सौर ऊर्जेवरही चालणाऱ्या बाईक तयार केल्या जात आहेत. यामध्ये आता अनेक मोठ्या दुचाकी कंपन्या भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच जपानची दिग्गज होंडा या कंपनीकडून आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली जाणार आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर Activa स्वरूपात असणार आहे.
दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढत आहे. लोकांचा कल ओळखून आता भारतात सर्वाधिक विक्री होणारी Honda Activa आता नवीन इलेक्ट्रिक रुपात म्हणजे Honda Activa Electric म्हणून लाँच करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीने भारतामध्ये होंडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंगलाही सुरूवात करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार होंडा 2024 पर्यंत 3 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वी होंडाची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर BENLY इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय रस्त्यांवर दिसली होती. मात्र, बॅटरी आणि रेंजची टेस्टिंग झाल्यानंतर कंपनी आपली बेस्ट सेलिंग एक्टिवा स्कूटरलाच Honda Activa EV स्वरुपात सादर करण्याची तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे होंडा कंपनीने 2024 पर्यंत जागतिक स्तरावर 3 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.