Electric Scooter : Honda ने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा फीचर्स अन् रेंज

HONDA EM 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात वाढते प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती यांमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर होंडा या जपानमधील वाहन निर्माण करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक HONDA EM 1 ची निर्मिती केली असून ह्या लेखात तिचे फीचर्स व्यवस्थितपणे समजून घेता येतील.

HONDA EM 1 चे फीचर्स

हि स्कुटर बनवताना ती तरुणाईला आवडेल अश्याच पद्धतीने तिची रचना करण्यात आली आहे. होंडा ची हि स्कुटर 1860 mm लांब आहे . सीटची लांबी 135mm आहे. EM 1 स्कुटर चे वजन एकूण ७५ किलो ग्रॅम आहे. हि स्कुटर खास करून शहरात चालवण्यासाठी करण्यासाठी एक उत्तम साधन आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये डिजिटल इस्ट्रेमेट डिस्प्ले, यू एस बी चार्जिंग सॉकेट अंडर सीट स्टोरेज स्पेस, रियर कॅरियर मागे बसणाऱ्या प्रवाश्यासाठी पिलन फुटपेग देण्यात आले आहे.

41.3 किलोमीटर रेंज –

कंपनीने स्कुटरमध्ये होंडा मोबाईल पॉवर पॅक म्हणजेच स्वेपेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ह्यातील बॅटरी तुम्ही बाहेर काढूनसुद्धा चार्ज करू शकता . एका सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कुटर 41.3 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतो. या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 45 किमी/प्रतितास आहे. गाडीमधील मोटर 0.58 kw क्षमतेची पॉवर आणि 1.7kw चा टॉर्क जनरेट करते. स्कुटरला ECON मोडवर 0.86 KW वर सेट केले आहे. ECON मोड हे गाडीला थ्रॉटल ऑपरेशन सॉफ्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावते.