हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑटो एक्स्पो (इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो ) 2025 मध्ये होंडाने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचसोबतच एक अत्याधुनिक फोल्डेबल इलेक्ट्रिक स्कूटरदेखील प्रदर्शित केली आहे. या स्कूटरमुळे भारतातील इतर कंपन्यांसाठी, जसे की चेतक, ओला आणि टीव्हीएस, स्पर्धा निर्माण होणार आहे. हि स्कूटर जवळच्या प्रवासासाठी तयार केली आहे. तसेच या फोल्डेबल गाडीचा सर्वात जास्त फायदा मुंबईसारख्या शहरांना होणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सुटकेसच्या आकाराची –
होंडाची ही स्कूटर खास छोट्या छोट्या प्रवासांसाठी डिझाइन केली गेली आहे, ज्यामुळे ती पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्टेशन ते ऑफिस आणि ऑफिस ते स्टेशन अशा छोट्या प्रवासांसाठी आदर्श ठरू शकते. या स्कूटरचे नाव Honda Motocompacto ठेवण्यात आले असून, ती एक सुटकेससारख्या आकारात फोल्ड होऊ शकते, ज्यामुळे ती सहजपणे उचलून नेली जाऊ शकते.
ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही –
Honda Motocompacto स्कूटरचे वजन केवळ 19 किलो असून, तिची रेंज 19.31 किमी आहे. 2026 मध्ये ही स्कूटर लाँच होण्याची शक्यता आहे. या स्कूटरमध्ये 0.7 kWh बॅटरी पॅक आहे, जो 490W पॉवर आणि 16Nm टॉर्क जनरेट करतो. स्कूटरमध्ये परमनंट मॅग्नेट डायरेक्ट-ड्राइव्ह मोटर आहे, जी पुढच्या चाकाला ताकद पुरवते. तसेच टॉप स्पीड 24.14 किमी प्रति तास आहे, आणि यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही. या फोल्डेबल इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइन आणि कार्यक्षमतेमुळे ही स्कूटर शहरातील प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर आणि आकर्षक पर्याय ठरू शकते.