हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडा (Honda) आपल्या दोन्ही सेडान कार होंडा सिटी आणि होंडा अमेझवर मोठा डिस्काउंट देत आहेत. या सवलती अंतर्गत ग्राहकांना तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत लाभ होणार आहे. त्यामुळे नवीन गाडी खरेदीदारांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे होंडाने यापूर्वी सुद्धा आपल्या गाड्यांवर बम्पर सूट जाहीर केली होती. चला जाणून घेऊया कोणत्या गाडीवर नेमकी किती रुपयांची सूट मिळतेय.
होंडा सिटी – Honda City
होंडा सिटी खरेदीदार ग्राहक रोख सवलत आणि मोफत अॅक्सेसरीज ऑफर यापैकी एक निवडू शकतात. यावर 7000 रुपयांचा एक्सचेंज बोनस ठेवण्यात आला आहे, मात्र होंडाचे जुने ग्राहकच याचा लाभ घेऊ शकतात. Honda City ची किंमत रु. 11.49 लाख ते रु. 15.97 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. यावर तुम्हाला रोख सवलत 10 हजार 946, लॉयल्टी बोनस 5000 तर 7000 रुपयांचा होंडा कार एक्सचेंज बोनस मिळतोय. यासोबतच 8 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणजेच तुमचे एकूण 30 हजार 946 एवढे रुपये वाचू शकतात.
होंडा अमेझ – Honda Amaze
होंडा अमेझ ची किंमत 6.99 लाख ते 9.60 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. होंडाच्या अमेझ या गाडीवर तुम्हाला रोख सवलत 10 हजार, ऍक्सेसरीज वर 12 हजार 296, लॉयल्टी बोनस 5000 आणि कॉर्पोरेट डिस्काउंट 6 हजार पर्यंत मिळणार आहे. म्हणजेच होंडा अमेझच्या खरेदीवर तुमची एकूण 23 हजार 296 रुपये बचत होऊ शकते.