Honey Export | शेतकऱ्यांच्या मधाला मिळणार चांगला भाव, सरकारने केली मोठी घोषणा

Honey Export
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Honey Export | आपल्या देशात आता मध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि आता याच मधउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता शेतकऱ्याच्या मधाला खूप चांगला भाव मिळणार आहे. सरकारने यावर्षी डिसेंबरपर्यंत नैसर्गिक मधावर 2 हजार डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य लागू केले होते. म्हणजेच किमान निर्यात किमतीपेक्षा कमी मध निर्यातीला परवानगी दिली जाणार नाही. असे सरकारने सांगितले होते. आता सरकारने घेतलेला या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार, असून त्यांच्या मधाला देखील चांगला भाव मिळणार आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली होती. या अधिसूचनेनुसार नैसर्गिक मधाची निर्यात (Honey Export) पूर्वी मोफत होती. परंतु आता त्यावर 2 हजार डॉलर प्रति टन किमान निर्यात किंमत लागू करण्यात येणार आहे. हे 31 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्या पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.

15 कोटी 32.1 लाख डॉलरची निर्यात

या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023 आणि 24 एप्रिल ते जानेवारी दरम्यान 15 कोटी 32.1 लाख च नैसर्गिक मधाची निर्यात झालेली आहे. मागील आर्थिक वर्षात ही रक्कम 203 दशलक्ष डॉलर्स एवढी होती.

शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव | Honey Export

मधमाशीपालन उद्योग महासंघाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. या निर्णयामुळे शेतमालाला चांगला भाव मिळणार असल्याचे संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. मध निर्यातीवर शेतकऱ्यांना स्वस्त दरात मध खरेदी करत होते. पण आता असे होणार नाही. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या मधाला चांगला भाव मिळणार आहे. 2022- 23 मध्ये मध निर्यातीसाठी प्रति टन सुमारे 3000 डॉलर्सचा भाव मिळत होता. तो सध्या परस्पर स्पर्धेमुळे 1400 डॉलर प्रती टन इतका कमी झालेला आहे.