हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने भारतीय बाजारात मजबूत कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor 200 Lite 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये तब्बल 108MP चा सुपर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. खास बाब म्हणजे होणरच्या या स्मार्टफोन मध्ये Magic Capsule फीचर सुद्धा मिळतेय जे आयफोनमधील डायनॅमिक आयलंड फीचर प्रमाणे काम करते. आज आपण या मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6.7-इंच डिस्प्ले –
Honor 200 Lite 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2,412 x 1,080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 2,000nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो . कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6080 SoC चिपसेट बसवली आहे. Honor चा हा स्मार्टफोन हे Android 14 आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असून यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय दिला आहे.
कॅमेरा- Honor 200 Lite 5G
मोबाईलचाय कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Honor 200 Lite 5G मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 108MP मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा मिळतोय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 35W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.1, OTG आणि USB Type-C पोर्ट आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
किंमत किती?
या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Honor 200 Lite 5G सायन लेक, मिडनाईट ब्लॅक आणि स्टाररी ब्लू रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहक येत्या 27 सप्टेंबरपासून Honor वेबसाइट आणि Amazon सारख्या प्लॅटफॉर्मवर हा मोबाईल खरेदी करू शकतात. SBI बँकेच्या ग्राहकांना या मोबाईलच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते.