Hormone Imbalance Tips आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यांच्या खाण्याच्या झोपण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अगदी लहान वयातच अनेक लोक आजकाल आजारांना बळी पडतात. यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे हार्मोनल असंतुळणाचा देखील समावेश होत आहे. हार्मोनल असंतुलन ही आजकाल एक मोठी समस्या झालेली आहे. तुमच्या शरीरातील हार्मोन असंतुलन झाले, (Hormone Imbalance Tips) तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. आता हे हार्मोनल असंतुलन होण्यासाठी आपल्या कोणत्या सवयी कारणीभूत असतात. हे आपण जाणून घेऊया तुम्ही तर या सवयी सुधारल्या तर तुमच्या हार्मोन संतुलित होतील.
शारीरिक हालचाल नाही
लोकांची व्यस्त जीवनशैली बैठेकाम यामुळे शरीराच्या हालचालींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे लठ्ठपणा वाढतच चाललेला आहे. लठ्ठपणा वाढला की, शरीरातील हार्मोन्सचा बॅलन्स बिघडतो. त्यामुळे केस गळणे, अपचन, वजन वाढणे यांसारख्या समस्या दिसू शकतात. तुम्हाला जर याचे शिकार व्हायचे नसेल, तर तुम्ही दररोज किमान 30 मिनिटे वर्ग करणे खूप गरजेचे आहे.
ताण घेणे | Hormone Imbalance Tips
तुम्ही जर जास्त ताण घेतला, तरी देखील तुमच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी प्राणायाम योगासने ध्यान या गोष्टींचा अवलंब करा.
खाण्याच्या चुकीच्या पद्धती
आपण बऱ्याचवेळा जंक फूड, तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न यासारख्या गोष्टी आवडीने खातो. परंतु या सगळ्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त घेतल्या, तर त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे हार्मोनलचे संतुलन ठेवण्यासाठी प्रथिने आणि फायबर युक्त आहार घ्या.
रात्री उशिरापर्यंत जागे राहणे
तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी तुम्हाला दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर नीट झोपत नसाल आणि रात्री उशिरापर्यंत जागत असाल. तरी देखील तुमच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात.
तुम्ही जर या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे केल्या तर तुमच्या शरीरातील असंतुलित हार्मोन्स पुन्हा एकदा संतुलित होतील. आणि तुमच्या शरीरातील सगळ्या क्रिया नीट होतील. त्यामुळे कितीही व्यस्त जीवनशैली आपण जगत असलो, तरी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.