Horoscope 2023 : संपूर्ण 12 राशींसाठी नवं वर्ष कसं असेल?

0
130
horoscope 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साल 2022 ला अवघे 3 दिवस राहिले असून लवकरच आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकालाच नव्या आशा (Horoscop 2023) आणि काही इच्छा असतात. गेल्या वर्षी पूर्ण न झालेलं संकल्प यंदातरी पूर्ण करावं असं म्हणत आपण नव्या वर्षावर काही ध्येयधोरणे ठरवत असतो आणि त्यादिशेने पाऊले टाकण्याचा आपला प्रयत्न असतो.

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रत्येकाला नवीन वर्ष कसे असेल (astrology) हे जाणून घेण्याची इच्छा असते. येत्या वर्षात ग्रह-नक्षत्रांचे आपल्या जीवनावर काय शुभ-अशुभ परिणाम होतील? आपली ध्येयधोरणे यशस्वी होतील का? नव्या वर्षात आपल्याला किती आर्थिक लाभ होईल? या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वार्षिक कुंडली (Horoscope 2023) चाय माध्यमातून प्रत्येकाच्या राशीनुसार आम्ही नोकरी, व्यवसाय, विवाह, प्रेम जीवन, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन आणि आरोग्याशी संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

1) मेष रास- Aries 

मेष राशींच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात वर्षाच्या सुरुवातीला काही अनिश्चितता आणि गोंधळ होईल परंतु उत्तरार्धात तुम्हाला यश मिळेल. या कालावधीत तुम्ही तुमची सर्व कामे निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण कराल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा सुधारेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामाची पावती आणि सन्मान होईल. इतरांशी बोलताना काळजीपूर्वक बोला. यंदा तुम्हाला घरातील लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. येव्हडच नव्हे तर जर तुम्ही अविवाहित असाल तर या वर्षी तुम्ही लग्न करू शकता. तुमच्या आरोग्यस्थितीबाबत सांगायचं झाल्यास ऑगस्ट 2023 पर्यंत तुमच्या आरोग्यात चढउतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. नियमित व्यायाम करून सकस आहारावर जोर द्या. या वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल.

2) वृषभ रास – Taurus

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत 2023 ची सुरुवात चांगली होईल. परंतु नंतरच्या काही महिन्यांनी आर्थिक समस्यांना समोर जावं लगेल. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम हाच खरा मंत्र ठरेल, परंतु वर्षाच्या शेवटी, गोष्टी आपल्या मार्गाने कार्य करण्यास सुरवात करतील. कामाशी संबंधित तुमचा प्रवासही होऊ शकतो. 2023 मधील पहिल्या तिमाहीत प्रेम आणि रोमान्ससाठी चांगला काळ आहे. कम्युनिकेशन ब्रेकडाउनमुळे वाद आणि तणावपूर्ण संबंध होऊ शकतात. तुमचा संवाद पारदर्शक ठेवा. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, सुरुवातीच्या काही महिन्यात तुमचं आरोग्य ठीक राहील परंतु एप्रिलनंतर तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. फेब्रुवारी आणि ऑक्टोबर हे २ महिने तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतात.

Horoscope 2023 : संपूर्ण 12 राशींसाठी नवं वर्ष कसं असेल? जाणुन घ्या तुमचं राशीभविष्य

3) मिथुन रास – Gemini

करिअर आणि आर्थिक क्षेत्रात मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष शुभ राहील. तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील. नशीब सुद्धा तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या कामाचा आनंदही घ्याल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्याल. यंदा कौटुंबिक जीवन शांततेने आणि आनंदाने भरलेले असेल. कुटुंबातील कोणाचे तरी लग्न होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात थोडीफार काळजी घ्या, बाकी संपूर्ण वर्ष तुम्ही आनंदी क्षणाचा अनुभव घ्याल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, फेब्रुवारी- मार्च नंतर आरोग्य चांगले राहील. काही लहान समस्या मात्र रेंगाळू शकतात. तुमच्यासाठी २०२३ मध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर हे महिने अनुकूल ठरतील.

4) कर्क रास – Cancer

करिअर आणि आर्थिक बाबतीत कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम आहे. यंदा तुम्हाला आर्थिक लाभ आणि नोकरीमध्ये आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. 2023 च्या शेवटच्या तिमाहीत, तुमच्या कारकीर्दीत उच्च पातळीवर जाण्याची आणि आर्थिक समृद्धीचा आनंद घेण्याची अपेक्षा करा. दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला थोडे चढ-उतार अपेक्षित आहेत. २०२३ मध्ये प्रियजनांसोबतच्या नातेसंबंधात काही चढ-उतार येऊ शकतात. जर कोणाला प्रपोज करायचे असल्यास ऑक्टोबर नंतर करा. एखाद्याशी बोलताना शक्यतो कठोर शब्द वापरणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत विशेषत: दुसऱ्या तिमाहीत सावधगिरी बाळगा. मात्र ऑक्टोबरनंतर तब्येत ठीक राहील. तुमच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना चांगला असेल.

5) सिंह रास- Leo

करिअर आणि आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांना या वर्षी अनेक संधी मिळतील. तुमच्या जून महिना हा आर्थिकदृष्ट्या खूप समृद्ध असेल. सत्ता आणि पदाचा लाभ होईल आणि तुम्ही सर्व शत्रूंवर मात कराल. परंतु तुमच्या बॉसला कधीही नाराज करू नका. २०२३ हे वर्ष नातेसंबंधांच्या बाबतीत छान राहील. तुमचे प्रेमसंबंध वाढतील आणि प्रेमीयुगुलांमधील मतभेद दूर होतील. कुटुंब आणि मित्रांसह तुमचे संबंध चांगले राहतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, पोटाची थोडीफार समस्या राहील. मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर तुमचे आरोग्य ठीक राहील. २०२३ मध्ये जून आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी फलदायी ठरतील.

6) कन्या रास – Virgo

करिअर आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला एप्रिल नंतर विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण याकाळात काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही ठिकाणी गुंतवुन करताना यथास्थिती ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर कराल. आपल्या कुटुंबाशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कारण नातेसंबंध बिघडण्याची शक्यता जास्त आहे. जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत कधीही अंहकाराची भावना ठेऊ नका. या २०२३ मध्ये शक्यतो शांत राहण्याचा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. गाडी चालवताना सावधानता बाळगा. जास्त स्टंट करू नका. तुमच्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिना सर्वोत्तम राहतील.

7) तूळ रास – Libra

तूळ राशीच्या लोकांसाठी २०२३ मध्ये आर्थिक स्थितीत तर वाढ होईलच, याशिवाय व्यवसायात सुद्धा प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. विशेषतः ऑक्टोबर नंतर तुमचे नशीब खूप वाढेल, तुम्ही तुमच्या कामात प्रशंसा मिळवाल. मे महिन्यानंतर तुमचं लग्न होऊ शकत किंवा आधीच तुम्ही विवाहित असल्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील. २०२३ मध्ये तुम्हाला आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो.

8) वृश्चिक रास- Scorpio

वृश्चिक राशींच्या व्यक्तींचा २०२३ मध्ये सातत्याने प्रवास होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश आणि आनंद मिळेल . तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्हाला मोठे यश मिळेल. २०२३ मध्ये सर्व लोकांशी तुमचे नातेसंबंध नीट राहील. तुमचं लग्न सुद्धा या वर्षात होऊ शकत. कुटुंबाप्रती तुमचं प्रेम वाढेल. मात्र वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सावधगिरी बाळगा आणि आपल्या प्रियजनांना नाराज न करण्याचा प्रयत्न करा. २०२३ मध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहील. मात्र तुमचे आई-वडील किंवा कुटुंबातील काही वडीलधारी व्यक्तींना काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सर्वोत्तम ठरेल.

9) धनु रास – Sagittarius

धनु राशींच्या लोकांना या वर्षात काही महत्त्वाच्या क्षेत्रात काही विशेष यश मिळेल. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कामाशी संबंधित सर्व निर्णय काळजीपूर्वक घ्या. या वर्षात तुमचे नातेसंबंध चांगले राहतील. भावंड आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, तुम्हाला विशेषत: पोटाशी संबंधित समस्या, अल्सर आणि पचनसंस्थेतील बिघाड याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. २०२३ मध्ये मे ते ऑक्टोबर तुम्हाला चांगला काळ राहील.

10) मकर रास – Capricorn

मकर राशींच्या लोकांसाठी २०२३ मध्ये आर्थिक उत्पन्न वाढण्याची आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वर्षात दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या काळात नोकरी न बदलण्याचा आणि गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो. वर्षाची शेवटची तिमाही जमीन आणि मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक करण्यासाठी योग्य ठरेल. २०२३ मध्ये मित्र आणि भावंडांसोबत तुम्ही खूप मजा कराल. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवादाचा आनंद घ्याल. मात्र शक्यतो एखाद्याशी बोलताना कठोर शब्द वापरू नका. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, हृदयाशी संबंधित काही समस्या असू शकतात परंतु शेवटचा तिमाही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहील. २०२३ मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना तुम्हाला फलदायी ठरेल.

11) कुंभ रास- Aquarius

करिअर आणि आर्थिक क्षेत्रात तुमची सुरुवात चांगली होईल तुम्ही तुमच्या कामासाठी वचनबद्ध राहाल. मार्च आणि एप्रिल हे आर्थिकदृष्ट्या चांगले महिने आहेत. मात्र नोव्‍हेंबर आणि डिसेंबरमध्‍ये नोकरीच्‍या संदर्भात तुमच्‍यावर खूप दडपण असेल आणि तुम्‍ही पूर्णपणे आर्थिक परिस्थिती हाताळण्‍यावर लक्ष केंद्रित कराल. नव्या वर्षाच्या रोमँटिक भागीदारीत अनुकूलता अनुभवायला मिळेल. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आनंदाचा अनुभव येईल, परंतु मार्च आणि एप्रिलमध्ये संबंध तणावपूर्ण बनतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, तुम्हाला डोळ्यांची समस्या होऊ शकते. तसेच सांधेदुखीचा त्रास होण्याचीही शक्यता असते. २०२३ मध्ये मे आणि सप्टेंबर महिना तुमच्यासाठी चांगला राहील.

12) मीन रास- Pisces

करिअर आणि आर्थिक बाबतीत मीन राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल आणि तुमच्या कामाचे मूल्यांकन होईल. मात्र वर्षाचा दुसरा आणि तिसरा तिमाही तणावपूर्ण असू शकतो. प्रणयरम्य नातेसंबंधांना काही उलथापालथीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, संपूर्ण वर्षभर तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुमचे हातपाय दुखणे चिंताजनक असू शकते. मे आणि सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल.