Saturday, March 25, 2023

क्रूरता! नवऱ्यानं केली बायकोची हतोड्याने ठेचून निघृण हत्या; विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी घेतला ताब्यात

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी । पत्नीला विवस्त्र करत हातपाय बांधून हतोड्याने व धारधार हुक ने शरीरावर प्रहार करीत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील अरुणोदय कॉलनीत उघडकीस आला. हत्या केल्यांनतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. जयश्री राम काळे असे मृत पत्नी चे नाव आहे तर राम काळे असे आरोपी पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पतीच्या मारहाणीला कंटाळून मयत जयश्री दोन मुलासह जालना जिल्हा सोडून औरंगाबादेत आली होती. ती एका बांधकामाचे सुरू असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून कामाला होती. सहा दिवसांपूर्वीच तिचा पती राम हा तेथे आला होता. आज सकाळी जेव्हा ठेकेदार कामावर जाण्यासाठी रामला घरी घ्यायला आला तेव्हा घरात जयश्री ही नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला आढळली. तर तिचा अडीच वर्षीय लहान मुलगा तिच्या मृतदेहाचे शेजारी झोपलेला होता. ही माहिती ठेकेदाराने तत्काळ पोलिसांना दिली.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता राजश्री चे दोन्ही हात पाय कापडाने बांधलेले होते तर तिच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर हतोड्याने व सेंटरिंग कामात वापरले जाणारे टोकदार हुक ने मारहाण करण्यात आले असल्याचे समोर आले. अत्यंत क्रूर पद्धतीने राजश्रीची हत्या करण्यात अली असून हत्येनंतर आरोपी पतीने ६ वर्षीय मोठ्या मुलाला सोबत घेऊन पळ काढला तर झोपलेल्या अडीच वर्षीय लहान मुलाला मृतदेहाजवळच सोडून आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीआहे. या घटने प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फरार आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.