हिडीस! ८० वर्षाच्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार

महोबा । घरात कोणीही नसताना पाहून एका ८० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा भयंकर आणि हिडीस प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील खरेला गावात ही घटना घडली आहे. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार, वृद्ध महिलेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. ८० वर्षीय महिला घरामध्ये एकटीच होती. एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य घराला बाहेरून टाळ लावून गेले होते. त्याचवेळी आरोपी जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

वृद्धे महिलेनं ओरडा-ओरड करू नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. कुटुंबीय घरी परत आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like