Horticulture Scheme 2024 | छतावर बागकामासाठी सरकार करणार 7,500 रुपयांची मदत; अशाप्रकारे घ्या योजनेचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Horticulture Scheme 2024 | सरकारकडून विविध योजना आणल्या जातात. अशातच आता बागायत दारांसाठी देखील विविध उत्कृष्ट योजना सरकारकडून येत असतात. जेणेकरून त्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. यासाठीच आता बिहारच्या राज्य सरकारकडून बागायतदारांसाठी पॉट स्कीम चालू करण्यात आलेली आहे. ही योजना 2024 – 25 अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत बागायतदारांना छतावर लागवड करण्यासाठी 7500 रुपयांपर्यंतच्या अनुदान दिले जाईल. सरकार ही योजना अशाच लोकांसाठी राबवत आहे. ज्यांच्या छतावर भरपूर मोकळी जागा आहे. आणि त्यांना बांधकाम करायची इच्छा आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे. आता या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

या जिल्ह्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे | Horticulture Scheme 2024

बिहार कृषी विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पॉट योजनेचा लाभ बिहारच्या पाटणा, गया, मुझफ्फरपूर आणि भागलपूरच्या शहरी भागात राहणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. 10,000 रुपयांच्या पॉटच्या युनिट किंमतीवर, सरकार या शेतकऱ्यांना 7,500 रुपयांपर्यंत सबसिडी देईल. जेणेकरून गमला योजनेंतर्गत बिहारचे शेतकरी शेतीत नावीन्य आणू शकतील आणि मर्यादित भागातही ताज्या भाज्या आणि फळे पिकवू शकतील.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्हालाही राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला बागायत संचालनालय, कृषी विभाग, बिहारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. याशिवाय शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते त्यांच्या जवळच्या कृषी विभागाकडून शासनाच्या या योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती मिळवून सहज अर्ज करू शकतात.