ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार रुग्णालय; सरकारचा मोठा निर्णय

ST Employees
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक पुरवठादारांना एकाच नियमनाच्या चौकटीत आणण्याची योजना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी जाहीर केली आहे. याचबरोबर, ST कर्मचाऱ्यांसाठी देखील एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रालयाच्या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रालयाच्या आयोजित बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी, एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे आणि मुंबईतील बोरिवलीत 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. या रुग्णालयांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध होतील.

त्याचबरोबर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. एसटी बसस्थानकांच्या जागांचा उपयोग कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केला जाणार आहे. महत्वाचे, म्हणजे, पुणे, कोल्हापूर, पूसद आणि वाशिम येथे रुग्णालय प्रकल्पांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत प्रवासी सुरक्षा, कार पूलिंग, लायसन्सिंग आणि तक्रार निवारणासाठी अधिक पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, “केंद्र सरकारच्या धोरणाचा अभ्यास करून या कंपन्यांना एकाच नियामक व्यवस्थेत समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये चारचाकी, बाईक आणि टॅक्सी सेवा समाविष्ट करण्यात येणार असून, महिला चालकांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.