Hot Summer Day : कडक उन्हात फिरल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक; कशी घ्याल काळजी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hot Summer Day) सध्या देशभरात कडक उन्हामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवेतील उष्णता दिवसागणिक वाढू लागली आहे. ज्यामुळे मानवी शरीराचे तापमान देखील निश्चितच वाढत आहे. जास्त उन्हामुळे उष्माघात, सनस्ट्रोक, डिहायड्रेशनच्या समस्या वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात या आरोग्यविषयक समस्यांना सर्वसामान्य समस्या म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही काळात कडक उन्हात फिरणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. याविषयी तज्ञ काय म्हणाले? ते जाणून घेऊया.

उन्हात फिरल्यामूळे येऊ शकतो हार्ट अटॅक?? (Hot Summer Day)

गेल्या काही दिवसांपासून सूर्य जणू आग ओकतो आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशाच्याही वर आहे. अशा कडक उन्हामुळे आजारपण येतं. मुख्य म्हणजे, असं ऊन लागल्यामूळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते असे तज्ञ सांगतात. एका वृत्तानुसार, उन्हाळ्यात तीव्र उन्हामध्ये (Hot Summer Day) फिरल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उन्हात फिरल्यामुळे हार्ट अटॅक येणं कसं शक्य आहे? याबाबत डॉक्टरांनी काही स्पष्ट विधाने केली आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

काय म्हणाले डॉक्टर?

एका वृत्तानुसार, कडक उन्हात फिरल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? असा प्रश्न विचारला असता डॉक्टरांनी हो असे उत्तर दिले. यासोबत त्यांनी काही महत्वाचे स्पष्टीकरण देखील दिले. डॉक्टरांनी सांगितले की, तीव्र उन्हामुळे मानवी शरीरात पाण्याची पातळी वेगाने कमी होऊ लागते. यामुळे शरीरात पटापट होणारे बदल हे हार्ट अटॅक येण्या कारण असू शकतात. अशावेळी काही लक्षणे दिसून येतात. ती कोणती हे जाणून घ्या खालीलप्रमाणे : –
तुम्हाला खूप थकवा जाणवतो,
चक्कर येऊ लागते,
डोळ्यासमोर अंधार येतो,
(Hot Summer Day)
धाप लागते,
तीव्र डोकेदुखी
होऊ लागते. अशावेळी तुमचा बीपी देखील वाढण्याची शक्यता असते. ही लक्षणे दिसून येताच आपल्याला हार्ट अटॅक येतोय हे समजावे.

‘अशी’ काळजी घ्या

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हालाही वेळी यावेळी घराबाहेर पडणे बंधनकारक असेल तर तुम्हाला तुमची विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी काय कराल? तर
जास्तीत जास्त पाणी प्या,
रसदार फळांचे सेवन करा,
उन्हात बाहेर पडताना गॉगल आणि स्कार्फचा वापर करा
. (Hot Summer Day) उन्हाळ्याच्या दिवसात खासकरून गर्भवती महिला आणि वयोवृद्ध लोकांनी काळजी घ्यावी. कारण बदलत्या हवामानाचा सगळ्यात आधी यांच्या तब्येतीवर परिणाम होतो.