हॉटेल व्यवसायिकाची अश्लील चित्रफीत काढून खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। मिरज शहरातील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी यांच्यासह मक्सूद भोकरे, मक्सूद जमादार, कामील बागवान, अक्रम काझी यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर मिरज शहर पोलिसात धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अय्याज नायकवडी यांनी तहसिलदार यांना फोन करून तुमची अश्लिल चित्रफित आमच्याकडे असल्याचे सांगत याबाबत तुमच्याशी चर्चा करायची आहे असे सांगितले. त्यानंतर तहसिलदार हे अय्याज नायकवडी यांच्या ऑफिसमध्ये गेले. तेथे नायकवडी यांनी तहसीलदार यांना कथित अश्लिल चित्रफित दाखविली. त्यावेळी अय्याज नायकवडी, मक्सुद भोकरे, मक्सुद जमादार हे तेथे उपस्थित होते.

अय्याज नायकवडी यांनी तहसिलदार यांना बदनामीची धमकी देवून ५ लाख रूपये त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी अय्याज नाईकवडी यांनी पुन्हा फोन करून पुन्हा त्याच ऑफिसमध्ये तहसिलदार यांना बोलावून घेतले. त्यावेळी कामील बागवान, अक्रम काझी असे दोन नवीन इसम तेथे उपस्थित होते. त्यांनी तहसिलदार यांना माझ्याकडेही अश्लिल चित्रफित असून आम्ही ती व्हायरल करू अशी धमकी दिल्यानंतर त्यांनी पुन्हा ५ लाख रूपये तहसीलदार यांच्याकडून उकळले. त्यानंतर परत काही दिवसांनी नायकवडी यांनी आणखी ५ लाखांची मागणी करून चित्रफित व्हायरल करून बदनामाची धमकी दिली. शेवटी वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तहसीलदार यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करत कारवाई केली.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment