कावळ्यांना दररोज खायला घालणारे अनोखे ‘कावळे मामा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । बदलते हवामान, वाढते औद्योगिकरण आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या ह्रासामुळे चिमण्या ,कावळे हे रोजच्या दिसण्यातले पक्षी सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या कावळ्याच्या प्रजातीदेखील यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र काळाचे आणि पर्यावरण संतुलनाचे महत्व ओळखून माढा येथील हाॅटेल चालक अर्जून भांगे यांनी कावळांच्या संवर्धऩासाठी एक पाऊल उचलेले आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून दररोज सकाळी कावळ्यांना विविध प्रकारचे खाद्य देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या नित्य नियमामुळे माढा परिसरात कावळ्यांची संख्या वाढली आहे.

दरम्यान अर्जून भांगे याचे माढा शहरात वैराग रोडवर हाॅटेल आहे. ते रोज पहाटे पाच वाजता हाॅटेल सुरु करतात. हाॅटेल सुरु करण्यापूर्वी ते कावळ्यांना खायला फरसाण, चिवडा, शेंगदाणे टाकतात. सुरवातीला तीन चार कावळे यायचे, नंतर या काळयांची संख्या वाढ गेली. आज मितीस दररोज शंभरहून अधिक कावळे येथे नित्य नेमाने खाद्य टिपण्यासाठी हजेरी लावतात. यामुळे जणू कावळ्यांना हाॅटेलवाले अर्जून भांगेंचा लळाच लागला आहे.

परिसरात भांगे यांची कावळे मामा अशी नवीन ओळख तयार झाली आहे. दरम्यान जेंव्हा पिंडदान असते तेंव्हाच या कावळ्याची सर्वजण वाट पाहतात. त्यांना त्या दिवशी गोडधोड खायला ठेवले जाते. परंतु इतरवेळी त्यांना कणकण भर अन्नासाठी भटकंती करावी लागते. हीच जाणीव ठेऊन अर्जुन भांगे हे कावळ्याची भुक भागवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या कावळे प्रेमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment