हाॅटेल, रेस्टारंटला अद्याप सूट नाही, मात्र उद्या टास्क फोर्ससोबत बैठक : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोनाचे संकट अद्याप हटलेले नाही. महाराष्ट्रातील रेस्टारंट असोशिएशनचे लोक माझ्याकडे आलेले होते. मात्र उद्या सोमवारी 9 आॅगस्ट रोजी टास्क फोर्सकडून आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. परंतु यासाठी 8 ते 10 दिवस लागतील. त्यामुळे हाॅटेल, रेस्टारंट यांना अद्यापही सूट नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोरोनाची लाट गेल्या वर्षीही कमी झालेली होती. मात्र सण, उत्सव झाल्यानंतर कोरोनाची प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हा आता निर्णय घेताना विचार करून लोकांच्या हितासाठी घेत आहे. सध्या लोकांच्याकडून हाॅटेल, रेस्टारंट सुरू करण्यासाठी मागणी होत आहे. परंतु जनतेच्या हितासाठी काही निर्णय मी मागे ठेवत आहे.

सध्या राज्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, बीड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्ह्यात अद्यापही काळजीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. तेव्हा उद्या टास्क फोर्ससोबत मिटींग होईल, त्यानंतर हाॅटेल, रेस्टारंट सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. परंतु त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment