Saturday, February 4, 2023

मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. हा घटना सोमवारी मध्यरात्री गारखेडा गावामध्ये घडली आहे. या घटनेत मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत उत्तम श्रावण चौधरी व वैशाली उत्तम चौधरी या पती – पत्नीचा मृत्यू झाला आहे. हि आग मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागली जेव्हा हे दाम्पत्य घरी झोपले होते.

या घटनेची कल्पना कोणालाच नव्हती. भुसावळ जामनेर रस्त्यावरुन जात असलेल्या ट्रकचालकास घरातून धूर येत असल्याचे दिसले तेव्हा त्या ट्रक चालकाने ग्रामस्थांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने लोकांना घरात प्रवेश करण्यास थोडा त्रास झाला.

- Advertisement -

अखेर ग्रामस्थांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला तोपर्यंत उत्तम श्रावण चौधरी व वैशाली उत्तम चौधरी यांचा आगीत होरपळुन मृत्यू झाला होता. उत्तम श्रावण चौधरी व वैशाली उत्तम चौधरी यांच्या माघारी एक विवाहीत मुलगी व एक मुलगा आहे.