Housing loan : आता LIC हाऊसिंग फायनान्सनेही होम लोन वरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Housing loan : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर सर्व बँका आणि फायनान्स कंपन्या आपले व्याजदर वाढवत आहेत. आता LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) ने देखील आपल्या होम लोन वरील व्याजदरात (LHPLR) 0.60 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता तो 7.50 टक्के झाला आहे. या फायनान्स कंपनीने सोमवारी सांगितले की,”या व्याज दर वाढीमुळे आता होम लोन वरील व्याजदर 7.50 टक्क्यांपासून सुरू होईल. तसेच 20 जून 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू केले जाणार आहेत.”

LIC Housing Finance: Griha Varishtha scheme! Home loan product with EMI  waivers - All details here | Zee Business

LHPLR हा प्रत्यक्षात एक स्टॅण्डर्ड व्याज दर आहे ज्याच्याशी LIC HFL कर्जाचा व्याजदर जोडला गेलेला आहे. एलआयसी एचएफएलचे एमडी वाय विश्वनाथ गौर यांनी सांगितले कि, “ही दर वाढ सध्याच्या बाजारातील परिस्थितीशी सुसंगत अशी आहे. मात्र व्याजाचे हे दर अजूनही खूप स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे होम लोनची मागणी स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.” Housing loan

LIC Housing Finance slashes home loan rates to all-time low of 6.66 per  cent.- The New Indian Express

मे महिन्यात दरवाढ करण्यात आली होती

हे लक्षात घ्या कि, कंपनीकडून मे महिन्यातही व्याजदरात वाढ केली गेली होती. मे महिन्यात RBI कडून रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केल्यानंतर कंपनीने होम लोनच्या व्याजदरात वाढ केली गेली. मात्र ही दर वाढ सिबिल स्कोअरच्या आधारे केली गेली आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये असे सांगण्यात आले आहे कि, चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी सुरुवातीच्या होम लोनच्या दरात 20 बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. Housing loan

LIC HFL cuts home loan rates to all-time low of 6.66% for select borrowers  | Business Standard News

यानंतर नवीन दर 6.9 टक्के करण्यात आला. या CIBIL स्कोअरपेक्षा कमी असलेल्या ग्राहकांसाठी, 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय नवीन टू क्रेडिट ग्राहकांसाठी होम लोनचे दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवले ​​आहेत. 3 मेपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. Housing loan

LIC Housing Finance (₹229): Buy - The Hindu BusinessLine

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती

हे जाणून घ्या RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर सर्व बँका आणि फायनान्स कंपन्या आपल्या व्याजदरात वाढ करत आहेत. या वेळी आता एलआयसी हाउसिंगने देखील व्याजदरात वाढ केली आहे. RBI ने मे महिन्यात पहिल्यांदा 40 बेसिस पॉईंट्स आणि नंतर जूनच्या सुरुवातीला 50 बेसिस पॉईंट्सने दर वाढवले ​​आहेत. यानंतर प्रत्येक कंपनी आणि बँक आपले दर वाढवत आहे. Housing loan

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.lichousing.com/

हे पण वाचा : 

Gold : पुढील पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

EPFO: नोकरी बदलल्या नंतर PF ट्रान्सफर करावा हे समजून घ्या

Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या

खुशखबर !!! आता Yes Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!

Leave a Comment