Xiaomi चे स्मार्टफोन इतके स्वस्त कसे काय ??? कंपनी अशा प्रकारे वसूल करते आपला खर्च

Xiomi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Xiaomi या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीचे मार्केट खूप वेगाने वाढत आहे. स्वस्त किंमतीमुळे भारतामध्ये ते खूप लोकप्रिय झाले आहेत. मात्र किंमती कमी केल्यामुळे शाओमी फोनच्या फीचर्सशी तडजोड करते असेही नाही. काउंटरपॉईंटच्या एप्रिल 2022 च्या एका रिपोर्टमध्ये असे आढळून आले की, Xiaomi, Realme, Samsung चे स्मार्टफोन भारतात 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. या विक्रीमध्ये Samsung Galaxy A13, Redmi 9A Sport, Realme C31 सारख्या फोनचा समावेश आहे.

शाओमीला ‘अ‍ॅपल ऑफ चायना’ असेही म्हटले जाते. या कंपनीकडे उत्पादनांची विस्तृत श्रेणी देखील आहे. मात्र, असे असले तरीही त्यांचे मुख्य टार्गेट उदयोन्मुख बाजारपेठा आहेत. आपल्या फोनची किंमती कमी करून कंपनी ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरते.

Xiaomi 11T Pro 5G 8GB 256GB Snapdragon 888 5000mAh 6.67"AMOLED Smartphone  Global | eBay

हे लक्षात घ्या कि, Xiaomi ने Apple iPhones आणि Samsung मधील नवीनतम फ्लॅगशिप्सच्या बरोबरीने स्मार्टफोन बनवण्यात यश मिळवले आहे. यामुळे कमी किंमतीत उच्च-गुणवत्तेचे स्मार्टफोन हवे असलेल्या ग्राहकांसाठी ते खूप फायदेशीर ठरत आहे. मात्र आपण कधी हा विचार केला आहे का की Xiaomi आपल्या फोनच्या किंमती इतक्या कमी कसे ठेवते ???

‘या’ कारणांमुळे Xiaomi चे फोन स्वस्त आहेत

हे जाणून घ्या कि, Xiaomi ची मुख्य रणनीती कमी नफ्यामध्ये जास्त फोन विकणे आहे. मात्र, दुसरीकडे Apple आणि Samsung सारख्या कंपन्या जास्त नफ्यामध्ये कमी फोन विकण्यावर लक्ष केंद्रित करतात. GizChina च्या रिपोर्टमध्ये, शाओमीच्या CEO ने सांगितले की,” कंपनीचा एकूण नफा फक्त 8% किंवा 9% आहे, जो सर्वात कमी म्हणता येईल. या कंपनीची बहुतेक विक्री ही ई-कॉमर्स वेबसाईटद्वारेच होते. तसेच यासाठी कंपनीकडून कोणतीही जाहिरात केली जात नाही.

Xiaomi certifies a new budget Redmi smartphone running Android 11 and MIUI  12.5 with a 50 MP camera - NotebookCheck.net News

जर आपण iPhones कडे पाहिले तर आपल्याला जाणवेल कि, या फोनच्या कॉम्पोनंट्सची किंमतच 36% ते 37% पर्यंत असते, ज्यामुळे त्यांना हे फोन 60% च्या नफ्याच्या फरकानेच विकावे लागतात. म्हणजेच 1 लाख किंमतीचा iPhone असेल तर त्यामध्ये 37 हजार रुपये किंमतीचे फक्त कॉम्पोनंट्सच असतात, त्यामुळे कंपनी मोठ्या नफ्यात iPhones विकते. जायच्या परिणामी ते खूप महागतात.

तसेच Xiaomi फोन स्वस्त असण्याचे दुसरे कारण म्हणजे कंपनीची प्रायव्हसी पॉलिसी. फोर्ब्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, शाओमी डीव्हाईसेसहीत येणारा वेब ब्राउझर हा ‘incognito mode’ मध्ये वापरला गेला असला तरीही युझर्सच्या सर्व ऑनलाइन ब्राउझिंग एक्टिविटी रेकॉर्ड करतो. यावरून असे दिसते की, कंपनी इतर डिव्हाइस मधील डेटा देखील गोळा करते. जे आपल्या ग्राहकांच्या पर्सनल लाइफबाबतची माहिती देते.

Redmi Note 12 Pro is launching in India this week, camera details revealed  - India Today

लवकरच घेऊन येत आहे नवीन फोन

याशिवाय अशीही माहिती समोर आली आहे की, कंपनीकडून Redmi Note 12 सीरीजचे तीन फोन Redmi Note 12 (5G), Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ लाँच केल्यानंतर कंपनी आता भारतात लवकरच Redmi Note 12 4G लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या अधिकृत पेजवरून अशी माहिती कळली की, Redmi Note 12 4G स्नॅपड्रॅगन 685 SoC आणि सेल्फी कॅमेरासाठी फोनमध्ये पंच होलसहीत 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mi.com/in 

हे पण वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत झाले बदल, जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे दर
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.25% व्याज
अदानीनंतर Hindenburg Report ने जॅक डोर्सीच्या ‘Block Inc.’ लावला सुरुंग, क्षणार्धात शेअर्स कोसळले
Mukesh Ambani बनले जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती, पहा लिस्ट
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट