पाकिस्तानसोबतचे 1971 चे युद्ध केवळ 13 दिवसांत कसे जिंकले? तुमच्याकडे 7 मिनिटं असतील तर ‘हा’ Video पहाच

sam manekshaw
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1971 साली पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले होते. यादरम्यान संरक्षण पत्रकार सुशील शर्मा यांनी भारताचे आर्मी चिफ सॅम बहादूर यांची एक मुलाखत घेतली होती. यामध्ये आर्मी चिफ सॅम बहादूर यांनी पाकिस्तानसोबत हे युद्ध 13 दिवसांत कशाप्रकारे जिंकले हे सांगितले आहे. ती मुलाखत चांगली चर्चेत राहिली होती. ती मुलखात घेणारे संरक्षण पत्रकार सुशील शर्मा यांचे आज कोरोनाने निधन झाले आहे. याबाबत इंडिया टुडेचे कार्यकारी संपादक शिव अरूर यांनी माहिती दिली आहे. तसेच शर्मा यांच्या त्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करुन तुमच्याकडे 7 मिनिटं असतील तर ‘हा’ व्हिडिओ पहाच असे म्हटले आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामध्ये आता पत्रकार शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. याबाबतची माहिती शिव अरूर यांनी ट्विट करून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘सुशील शर्मा हे विनोदी स्वभावाचे होते. तसेच काही प्रमाणात त्यांच्यात आक्रमकताही होती. त्यांनी 1997 मध्ये सॅम बहादूर यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत चांगली चर्चेत राहिली होती. पण आज सुशील शर्मा आपल्यात नाहीत’.

दरम्यान यापूर्वीहि अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये आजतकचे पत्रकार रोहित सरदाना, दूरदर्शनच्या पत्रकार कनुप्रिया यांचादेखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता पत्रकार सुशील शर्मा यांचे कोरोनाने निधन झाले आहे.