काश्मिर हिंदूच्या रक्ताने भिजताना कसली 8 वर्ष साजरी करता : संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | काश्मिर मधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यांचा आक्रोश ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही, ते सध्या चित्रपट प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. श्रीनगर पासून पुलवामा पर्यंत सुरक्षा दलात काम करणाऱ्या 20 मुस्लिम अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. कारण ते देशाच्या संरक्षणाचे काम करत आहेत. काश्मिरी हजारो पंडित पलायन करत आहेत. रोज काश्मिर हिंदूच्या रक्ताने भिजत आहे, पंडिताच्या हत्या होत आहेत, अशावेळी कसली 8 वर्ष साजरी करत आहात, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला केला आहे.

संजय राऊत यांनी काश्मिर पंडितांच्या हत्या व भाजपाचे चित्रपट प्रमोशन याबाबत माध्यमांशी संवाद साधला. तसेच 15 जून रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आयोध्येला जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, काश्मिरमध्ये आक्रोश, पलायन सुरू असताना, त्यावर एकही भाजपाचा नेता बोलायला तयार नाही. अशावेळी पहिल्यांदा काश्मिर फाईल्स झाले आता पृथ्वीराज चित्रपटाच प्रमोशन करण्यात केंद्र सरकार व्यस्त आहेत. 1990 साली काश्मिरी पंडित हत्याकांड झाले, पलायन झाले. त्यावेळी केंद्रात भाजपचीच सत्ता होती, आताही तेच सत्तेत आहेत. भाजपाने रिपोर्ट कार्डमध्ये कश्मिरी पंडितांना घरे देणार होते, त्याच काय झालं. मशिदीत शिवलिंग शोधणारे काश्मिरी पंडिताच्या मुद्यावर गप्प का असा सवालही विचारला आहे.

काश्मिरी पंडितांसाठी शिवसेनेचा प्लॅन

आदित्य ठाकरे 15 जूनला आयोध्येला जाणार आहेत. आदित्य ठाकरेचा दाैरा हा राजकीय नसून धार्मिक आहे. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना काश्मिरी पंडितच्या सोबत राहिल. त्यांच्या कुटुंबासाठी जी काही मदत करावी लागेल ती केली जाईल. याबबत आम्ही एक प्लॅन बनवत आहोत.