हाऊ इज द जोश !!! एम्स मधील कोरोना चाचणीसाठी १०० स्वयंसेवकांची गरज, १००० हुन अधिक जण तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मार्चमध्ये राज्यात सगळीकडे लॉक डाउन ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉक डाउन चा कालावधी दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील सारे शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी आटोकाट मेहनत घेत आहेत. भारतातील अनेक संस्था त्याच्या तयारीला लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लसीच्या बाबतीत चांगली बातमी आली .त्या अनुषंगाने एम्स रुग्णालयाने मानवी चाचणी घेण्याचा विचार केला आहे. १०० स्वयंसेवकांची त्यांना गरज होती पण एका दिवसात १००० हुन अधिक कॉल आले आहेत . त्यामुळे कोरोनाच्या चाचणीसाठी अहोरात्र काम करण्यासाठी आमचा जोश वाढला आहे. अशी माहिती एम्स चे डॉ संजय रॉय यांनी दिली.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाच्या लसीची प्रात्यक्षिक केले जाणार आहे. त्याच दरम्यान एम्सच्या एथिक्स कमिटीकडून ट्रायलला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी रुग्णालयाकडून छोटेसे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही तासातच एक हजारपेक्षा जास्त लोकांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला. संपर्क साधण्यासाठी एक फोन नंबर जाहीर केला होता. त्यावर अनेक कॉल्स येत होते. तसेच अनेक जणांनी ई-मेल द्वारे संपर्क साधला आहे. त्यामध्ये प्रत्येकाला सामावून घेतले जाऊ शकत नाही पण सर्वाना उत्तर देण्याचे काम सुरु झाले आहे.

एम्समध्ये होणाऱ्या या फेज वनच्या चाचणीत फक्त १०० स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात चाचणीला सुरुवात होईल आधी स्वयंसेवकांची यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर नमुने गोळा केले जातील . परंतु त्या मध्ये ज्यांना कोरोना आहे किंवा कोरोनाची चाचणी नेगेटिव्ह आहे अश्याना सहभागी होता येणार नाही.लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहून आमचा पण जोश हा वाढला आहे. इतक्या प्रचंड संख्येने प्रतिसाद पाहून आम्हाला फार आनंद झाला असे एम्स चे डॉक्टर म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment