तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? अशा प्रकारे करा चेक

Sim Card Identity
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगामुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. या तंत्रज्ञानामुळे अनेक फसवणूकीच्या केसेस वाढल्या आहेत. या फसवणूक आपण वापरत असलेल्या सिम कार्डमुळे होतात. याचे प्रमाण मागच्या अनेक वर्षांपासून  होताना आपण पाहिले आहेत.  तुमच्यातील अनेकजण याचे शिकारही झाले असतील. परंतु, यामधून बाहेर निघण्यासाठी तंत्रज्ञानच मदत करते. ते कसे ते जाणून घेऊयात.

फसवणूकीच्या या केसेस सिम कार्ड पासूनच सुरु होतात. कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाने सिम कार्ड (Sim Card) घेतले जाते आणि त्यावरून त्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढले जातात. अश्या अनेक केसेस तुम्ही ऐकल्या असतील. जर असे मेसेज तुमच्या मोबाईलवर येत असतील तर अश्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी एका सेकंदाचाही अवधी लागत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने संचार सारथी पोर्टलची सुरुवात केली आहे. त्याच्या माध्यमातून तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत आणि ते सिम कार्डचा वापर कोण करत आहे. याची ओळख अवघ्या 60 सेकंदात कळते. तसेच ते सिमकार्ड आत्ता चालू आहे का हे सुद्धा समजेल.

कशी आहे प्रक्रिया?

१) आपल्या नावावरती किती सिम आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी tafcop.sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
२) त्यावरती तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे.
३) त्यानंतर तुम्हाला एक कोड टाकायला सांगितलं जाईल ते टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल
४) तो OTP टाकल्यानंतर तुमचे लॉगिन होईल.
५) ते झाल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल की, तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत.
६) जर यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक वेगळा दिसला तर तुम्ही तो तिथे लगेच बंद करू शकता आणि अश्या होणाऱ्या फसवणूकीतून स्वतःला वाचवू शकता.