हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रस्त्यावर धावणारी वाहने त्याच्या आकार, रंग आणि फिचर्समुळे कायम लक्ष वेधून घेतात. मात्र, बऱ्याच वेळा या गाड्यांवर असणाऱ्या नंबर प्लेटकडे देखील आपले कधी ना कधी लक्ष जातेच. तेव्हा आपल्या लक्षात येते की प्रत्येक वेगवेगळ्या गाडीवर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात आली आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की अशा नंबर प्लेट का लावल्या जातात. तसेच प्रत्येक गाडीसाठी कोणत्या रंगाचे नंबर प्लेट असते. नसेल माहित तर जाणून घेऊयात.
1) पांढऱ्या रंगावर पांढऱ्या अक्षरांनी लिहिलेली नंबर प्लेट – भारतामध्ये ज्या कोणत्या प्रायव्हेट गाड्या आहेत, त्या सर्व गाड्यांना पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात आली आहे. म्हणजे बॅकग्राऊंड चा रंग पांढरा असतो आणि त्यावर काळ्या अक्षरांनी आकडे लिहिलेले असतात. अशी नंबर प्लेट फक्त प्रायव्हेट गाड्यांसाठी देण्यात येते.
2) पिवळ्या रंगावर काळ्या अक्षरात लिहिलेली नंबर प्लेट – मुंबईमध्येच्या कोणत्या टॅक्सी दिसतील त्यावर आपल्याला पिवळ्या रंगाची नंबरप्लेट लावलेली दिसेल. म्हणजेच अशा पद्धतीची नेमप्लेट ही कमर्शियल वाहनांसाठी देण्यात येते. थोडक्यात टॅक्सी, रिक्षा अशा गाड्यांना पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते.
3) हिरव्या रंगावर पांढऱ्या अक्षरांनी लिहिलेली नंबर- इलेक्ट्रिक वाहनांची ओळख व्हावी यासाठी हिरव्या रंगाची नंबर प्लेट देण्यात येते. इतर कोणत्याही वाहनासाठी हिरव्या रंगाची नंबरप्लेट वापरण्यात येत नाही.
4) हिरव्या रंगावर पिवळ्या अक्षरांनी लिहिलेली नंबर प्लेट- जी कोणती कमर्शियल इलेक्ट्रॉनिक वाहने आहेत त्यांना अशा पद्धतीचे नंबर प्लेट देण्यात येते. थोडक्यात, जी इलेक्ट्रॉनिक वाहने व्यवसायाचे साधन म्हणून वापरले जातात, त्यांना हिरव्या रंगाचे नंबर प्लेट लावण्यात येते.
5) काळ्या रंगावर पिवळ्या अक्षराने लिहिलेली नंबर प्लेट – अशा प्रकारची नंबर प्लेट ही रेंटल वाहनांना लावण्यात येते. रेंटल वाहने म्हणजेच जी रेंटवर खरेदी करण्यात आली आहे.
6) काळ्या रंगावर पांढऱ्या अक्षरांनी लिहिलेली नंबर प्लेट – मिलिटरी किंवा डिफेन्सच्या ज्या गाड्या असतात त्या सर्व गाड्यांना अशा पद्धतीने नंबर प्लेट लावण्यात येते. इतर कोणत्याही गाड्यांसाठी ही नंबर प्लेट वापरली जात नाही.
7) निळ्या रंगावर पांढऱ्या अक्षरांनी लिहिलेली नंबर प्लेट- अशा पद्धतीची नंबर प्लेट ही एमबीसी वाहनांसाठी वापरण्यात येते. अशा नंबर प्लेट्समध्ये प्रामुख्याने तीन कोड असतात- CC (कॉन्स्युलर कॉर्प्स), यूएन (युनायटेड नेशन्स), किंवा सीडी (कॉर्प्स डिप्लोमॅटिक).
8) लाल रंगावर अशोक चक्र असणारी नंबर प्लेट – अशा पद्धतीची नंबर प्लेट फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या गाड्यांवर लावण्यात येते. इतर कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसते.