‘ही कितवी बायको आहे’ ? पोलिस निरीक्षकांच्या एका प्रश्नामुळे उलगडले दुसऱ्या खुनाचे रहस्य; सराफा खून प्रकरणातील आरोपींने दोन महिन्यांपूर्वी केला प्रेयसीचा खुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : शिरुर येथील सराफा व्यावसायिक विशाल कुलथे खून प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैया गायकवाड याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे नाशिकमधून अटक केली. दरम्यान, चौकशीत भैया गायकवाडने मित्राच्या मदतीने दोन महिन्यांपूर्वी प्रेयसीचाही खून केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली. असे पीआय भारत राऊत यांनी चौकशीत ‘हि कितवी बायको आहे? ‘असे विचारले अन गोंधळलेल्या ज्ञानेश्वरवरकडून दुसराही खून उघड झाला.

मूळचा शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील ज्ञानेश्वर गायकवाड हा शिरुर येथे मामाकडे वास्तव्यास होता. गावात मुलींची छेड काढत असल्याने त्याला एकदा चोप मिळाला अन घरच्यांनी त्याची रवानगी शिरुरला मामाकडे केली. दरम्यान ज्ञानेश्वरची सोशल मीडियावरून शीतल भामरे या विवाहितेशी ओळख झाली. ती नाशिक जवळील गाडेकर मळा येथील रहिवासी. तिला दोन मुले आहेत मात्र, त्याच्या प्रेमात पडल्याने ती सहा महिन्यांपूर्वी शिरुरला आली. दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशीप ‘ मध्ये राहू़ लागले. मात्र चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देऊ लागल्याने शीतलने मला परत नाशिकला सोड म्हणून त्याला सांगितले. 15 मार्च रोजी मित्र केतन लोमटेला सोबत घेऊन त्यात राहुरीजवळ केतन व भैयाने डोक्यात दगड घालून शीतलचा मार्चमध्ये खून केला.

त्यानंतर एप्रिल मध्ये ज्ञानेश्वरने पुन्हा दुसर्या मुलीशी लग्न केले. मात्र यानंतर महिनाभरात त्याने सराफचा खून केल्यामुळे त्याने पत्नीचा नाशिक गाठले. पत्नीच्या ओळखीने तिथे बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला पण तो जाळ्यात सापडला.

Leave a Comment