यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवते आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसात वारंवार पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शरीरातील पाणी कमी होण्याचा धोका जास्त असतो. योग्य प्रकारे पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण पाणी किती प्यावं ? कशाप्रकारे प्यावं ? चला जाणून घेऊया..
पाणी किती प्यावे?
साधारणत: एक व्यक्तीला दररोज 8-10 ग्लास (2-2.5 लीटर) पाणी प्यायचं असतं. जर शारीरिक श्रम जास्त करत असाल तर या प्रमाणात वाढ होऊ शकते.
शरीराची गरज आणि हवामानानुसार पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे लागते.
कशा प्रकारे पाणी प्यावे?
थोड्या थोड्या वेळाने: एकदम जास्त पाणी न पिऊन, दर १-२ तासांनी थोडं-थोडं पाणी पिऊन पिऊन शरीरात पाणी साठवून ठेवावं.
कोमट पाणी: गरम पाणी किंवा कोमट पाणी पिणे पचनासाठी चांगले असते. यामुळे शरीराच्या हायड्रेशनला मदत मिळते.
लिंबू पाणी:लिंबाच्या रसाने तयार केलेलं पाणी पिणं हायड्रेशनसाठी फायदेशीर आहे. यामध्ये शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे कार्य असते.
नारळपाणी:नारळपाणी शरीरासाठी अत्यंत थंड आणि पचायला हलकं असतं, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढता येते.
ताज्या फळांच्या रसांद्वारे: ताज्या फळांचा रस, जसं की संत्र्याचा रस, पाणी म्हणून प्यायला चांगला असतो. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळीही वाढते.
पाणी पिण्याची योग्य वेळ
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणे शरीरात राहिलेल्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. जेवणापूर्वी आणि नंतर पाणी पिऊ नका, कारण हे पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतं. हे लक्षात ठेवून उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.