नवी दिल्ली | डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रशासन सातत्याने पावले टाकत आहे. आर्थिक व्यवहार, पैश्यांची देवाण घेवाण, आणि इतर व्यवहार सुरक्षित व्हावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो आहे. रोख रकमेचे व्यवहार करण्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहेत. घरात किती रोख रक्कम असावी यासंदर्भात मर्यादा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पण विचारणा झाल्यास रकमेचा आर्थिक स्रोत सांगणे बंधनकारक असणार आहे.
जर तुम्ही व्यावसायिक असाल तर 10 हजार पेक्षा जास्त रक्कम खर्च केली तर ती रक्कम व्यवसायाच्या नफ्यात जोडण्यात येईल. यासोबत 50 हजार पेक्षा जास्त रक्कम ही फॉरेन एक्सचेंज मध्ये जाऊन घेता येणार नाही. तसेच बँक खात्यातून दोन लाखापेक्षा जास्त रक्कम रोख काढल्यास त्यावर टीडीएस लागणार आहे.
यासोबतच डिजिटल व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करत आहे. स्मार्टफोनच्या मध्यामातून अनेक आर्थिक व्यवहार डिजिटल करण्याचे सहज शक्य झाले आहे. रोखीने व्यवहार करण्यासाठी सरकारकडून अनेक बंधने करण्यात आली आहेत. शिवाय रोख व्यवहार संबंधी नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात रोख रक्कम जास्त प्रमाणात सोबत ठेवणे नुकसानदायक ठरेल अशी चर्चा आर्थिक वर्तुळात पाहायला मिळत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group