Wednesday, June 7, 2023

कोणत्या नोकरीसाठी किती रुपये? फडणवीसांनी विधानसभेत वाचून दाखवलं रेट कार्ड

मुंबई | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.

या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

तसंच कोणत्या नोकरीसाठी किती रुपयांचा दर सुरु आहे याचं रेटकार्डच फडणवीसांनी विधानसभेत सांगितलंंय. क गटातील नियुक्ती करिता १५ लाख रुपये, ड गटातील नियुक्तीकरिता ८ लाख रुपये दावा दलालांकडून केला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.