ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा; अशाप्रकारे काढा आयुष्मान वयवंदन कार्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकार आता मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. आयुष्मान व्यवंदन कार्डच्या माध्यमातून 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना मोफत उपचार व औषधांची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये जुन्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आयुष्मान व्यवंदन कार्ड –

29 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानात धन्वंतरी जयंती आणि आयुर्वेद दिनानिमित्त 12850 कोटी रुपयांच्या आरोग्य योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले की, 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान व्यवंदन कार्ड सुरू करण्यात आले आहे.

कार्डची वैशिष्ट्ये –

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सीनियर सिटीझन्ससाठी एक महत्त्वाची सुविधा प्रदान केली आहे, ज्यामुळे सर्व आर्थिक स्तरांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनाशुल्क वैद्यकीय सेवा मिळवता येईल. या योजनेच्या माध्यमातून, रुग्णालयात दाखल होण्याआधीच्या सर्व खर्चांसह, औषधे, लेबोरेटरी तपासणी, डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश असलेल्या उपचारांची पूर्ण मोफत सेवा मिळेल. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलोअप देखभाल देखील मोफत उपलब्ध असेल. यामध्ये जुन्या आजारांवरही सुरुवातीपासून उपचार केले जातील.

योजनेचे उद्दिष्ट –

या योजनेचे उद्दिष्ट सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ देणे आहे, ज्यामुळे प्रत्येक आर्थिक गटातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कार्डसाठी अर्ज –

आयुष्मान व्यवंदन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. अर्जासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. ज्यामुळे पात्रता तपासली जाऊ शकते. अर्ज ऑनलाइन आयुष्मान अ‍ॅपच्या माध्यमातून करता येतो, ज्यामध्ये सोप्या पद्धतीने नोंदणी केली जाऊ शकते. आतापर्यंत सुमारे 10 लाख ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. आयुष्मान भारत कार्ड देशभरातील आरोग्य सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवते. हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी खास महत्वाचे आहे, कारण त्यामुळे त्यांचे औषधांवरील खर्च कमी होईल आणि त्यांना आवश्यक आरोग्य सेवांचा फायदा मिळेल.