7/12 उताऱ्याशिवाय शेतजमीन कशी विकत घ्यावी?, जाणून घ्या कायदेशीर पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | महाराष्ट्रमध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा उतारा आहे. त्या व्यक्तीलाच शेत जमीन खरेदी करता येते. असा नियम देखील करण्यात आलेला आहे. परंतु असा नियम आल्यापासून इतर लोकांना शेतजमीन खरेदी करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक लोकांकडे शेती नसते, परंतु त्यांना शेती करण्याची आवड असते. शेतजमीन घ्यायची आवड तसेच पैसा असून, देखील त्यांना शेतजमीन खरेदी करता येत नाही. कारण त्यांच्या नावावर सातबारा नसतो. परंतु अशावेळी नेमके काय करायचं? हे लोकांना समजत नाही. तर आज आपण ज्या लोकांच्या नावावर सातबारा उतारा नाही आणि त्यांना शेतजमीन खरेदी करायची आहे. त्यांना काय करता येईल? हे जाणून घेणार आहोत.

आधीच्या पिढीने विकलेल्या जमिनीची विक्री पत्राची प्रत पुरावा

महाराष्ट्र सरकारने शेती जमिनीवर शेतकऱ्यांनाच अधिकार असावा. या उद्देशाने हा कायदा तयार केलेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबांच्या आधीच्या पिढीने शेत जमीन विकली, असल्याने अशा कुटुंबातील व्यक्तींना शेतजमीन खरेदी करता येत नाही. म्हणजे जर तुमच्या नावावर सातबारा नसेल आणि तरी देखील तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढ्यांनी वडिलोपार्जित जमीन नेमकी कोणाला विकली आहे. याची माहिती करून त्या विक्री पत्राची कॉपी देऊन तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापरू शकता.

विक्री पत्रावर तुमच्या वडिलापार्जित शेतीचा जुना सातबारा क्रमांक मिळेल, त्या क्रमांकावरून तुम्ही त्या वेळच्या रेकॉर्डची कॉपी देखील मिळू शकता. यावरून तुम्ही वंश परंपरेने शेतकरी आहात. हे सिद्ध होईल. मग तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र बनवून घेता येईल. तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवले की, तुम्हाला शेतजमीन घेता येईल.

नातेवाईकांच्या नावावर नाव लावू शकता

यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची मदत लागणार आहे. म्हणजे जर तुमचे काका, चुलत काका, आईचे वडील यांची जमीन असेल, तर त्या जमिनीच्या उतारावर तुमचे नाव लावून घेणे, हा एक पर्याय आहे. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे नाव लावून घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला तुमची जमीन खरेदी करता येईल. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना हक्क सोडपत्र देऊ शकता. ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात देखील नाही. कारण ज्या व्यक्तीला वारस म्हणून शेती मिळते, तो आपोआप शेतकरी होत असतो.