Cibil Score कसा मोजला जातो? कोणत्या गोष्टी त्यावर परिणाम करतात?

CIBIL Score
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर कोणत्याही बँकेकडून अगदी आरामात तुम्हाला कर्ज मंजूर होते. परंतु जर तुंकव्हा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र कर्ज काढताना तुमच्यापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. साधारणपणे 750 किंवा त्याहून जास्त CIBIL स्कोअर चांगला मानला जातो. परंतु सिबिल स्कोर नेमका मोजला कसा जातो हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चला आज आपण जाणून घेऊया….

CIBIL स्कोअर सामान्यतः क्रेडिट ब्युरोद्वारे अनेक महत्त्वाच्या घटकांच्या आधारे मोजला जातो. यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली हे पाहिले जाते. क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाते. क्रेडिट वापराचे प्रमाण किती आहे हे बघितलं जाते.

कर्जाची परतफेड- Loan repayment history

जर तुम्ही आधी कर्ज घेतले असेल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्या कर्जाची परतफेड तुम्ही कशी केली याची हिस्ट्री चेक केली जाते. जर तुम्ही योग्य वेळेत हप्ते भरले असतील तर तुमच्या क्रेडिट स्कोरवर त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु EMI भरल्यास त्याचा क्रेडिट स्कोर वर निगेटिव्ह परिणाम होतो. त्यामुळे सिबिल स्कोर मोजताना कर्जाची परतफेड हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

क्रेडिट वापराचे प्रमाण (Credit Utilization) –

तुमच्या जेवढं क्रेडिट लिमिट आहे त्याच्या किती टक्के तुम्ही वापर करता त्यावरून तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो ठरतो. सर्वसामान्यपणे सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड लिमिटच्या फक्त 30% पर्यंत वापर करा. जर जास्त वापर केला तर असा संदेश जातो की तुम्ही क्रेडिट कार्डवरच अवलंबून आहात आणि यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर निगेटिव्ह परिणाम होतो.

क्रेडिट मिक्स -Credit Mix

तुम्ही यापूर्वी घेतलेली असुरक्षित कर्जे सुरक्षित कर्जे यावरून तुमचे क्रेडिट मिक्स समोर येते. जर तुम्ही असुरक्षित कर्जे म्हणजेच पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड नेहमीच घेत असाल सर्व याचा अर्थ तुमच्याकडे पैशाची कमतरता असून क्रेडिटवरचा तुम्ही जास्त अवलंबून आहे असे स्पष्ट होते आणि त्यामुळे सिबिल स्कोरवर निगेटिव्ह परिणाम होतो. तर दुसरीकडे, जर तुम्ही गरजेनुसार, सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज घेत असाल आणि मुख्य म्हणजे ते पैसे वेळेवर भरत असाल तर तुमचे क्रेडिट मिक्स कंट्रोल मध्ये राहते आणि सिबिल स्कोर वाढण्यास मदत होते.

सिबिल स्कोअर कोण तयार करतात –

सर्व क्रेडिट ब्युरो CIBIL स्कोर सादर करतात. यामध्ये ट्रान्सयुनियन CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark या क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्यांना लोकांच्या आर्थिक नोंदी गोळा करण्यासाठी, ते मेंटेन करण्यासाठी आणि या डेटाच्या आधारे क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी लायसन्स देण्यात आले आहे. हे क्रेडिट ब्युरो ग्राहकांच्या डेटाचे मोजमाप करून त्याच्या आधारावर CIBIL स्कोर तयार करतात.