#HappyMakarSankrant | मकर संक्रांतीचा सन वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, प.बंगाल आणि आसाम या राज्यांत मकर संक्रांत कशी साजरी करण्यात येते हे आपण पाहूयात.
१) उत्तरप्रदेश – मकर संक्रांतीला खिचडी पर्व म्हणून ओळखले जाते. या दिवशी सूर्याची पूजा करून तांदूळ आणि डाळ याची खिचडी सेवन केले जाते. तसेच दान केले जाते.
२) गुजरात आणि राजस्थान – उत्तरायण पर्वाच्या स्वागतासाठी या दोन्ही राज्यात पंतग उडवून हा उत्सव साजरा करण्यात येतो.
३) आंध्रप्रदेश – आंध्रप्रदेशमध्ये तब्बल तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
४) पश्चिम बंगाल – हुबळी नदीच्या काठावर गंगा सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत भाविक या उत्सवात सहभागी होतात.
५) आसाम – या ठिकाणी भोगली बहू नावाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.