देवगड कि कर्नाटक? कसा ओळखावा अस्सल हापूस आंबा? २ मिनिटांत जाणून घ्या

Agriculture News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फळांचा राजा असलेला आंबा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आंबा हा विशेषतः उन्हाळ्यात खायला मिळतो. या दिवसांत सुट्ट्यांबरोबरच चाहूल लागते ती आंब्याची. इतर फळांच्या तुलनेत आंबा महागही असतो. मात्र असे असले तरीही त्याची आवड काही कमी होत नाही. आंब्याला देशात तसेच परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. खास करून देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या जातींच्या आंब्यांची मागणी जास्त असते.

सर्वात कमी किंमतीत दर्जेदार आंबा कुठे मिळेल?

तुम्हाला कमी किमतींत अस्साल देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबा हवा असेल तर आता तुम्ही थेट कोकणातील शेतकऱ्याकडून आंबा खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला Hello Krushi नावाचे मोबाईल अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावे लागेल. या अँपवर शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करता येते. तुम्ही आंब्यासोबतच गहू, इंद्रायणी तांदूळ, मध, ज्वारी, पापड असे अनेक गोष्टी कमी दरात शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकता.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

या दिवसांत अनेकदा आपण जास्त पैसे देऊन देवगड हापुस आंबा खरेदी करतो. मात्र, नंतर आपल्या लक्षात येते कि आपली फसवणूक झाली आहे. कारण अनेकदा आपल्याला देवगड किंवा रत्नागिरी हापूस म्हणून कर्नाटकी हापूस आंबा देऊन फसवले जाते. तर आजच्या या बातमीमध्ये आपण या दोन्हीतील फरक कसा ओळखायचा ते जाणून घेणार आहोत…

१) देवगड हापूस आंबा ओळखण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे त्याची साल. जी कर्नाटकी हापूस आंब्याच्या तुलनेत पातळ असते तर कर्नाटकी हापूसचे आंब्याची साल जाड असते.

२) देवगड हापूस आंबा आकारावरुनही ओळखता येऊ शकेल. जे साधारणपणे गोलाकार असतात तर कर्नाटकी हापूस आंब्याचा आकार काहीसा उभट असतो.

३) देवगड हापूस आंबा हा त्याच्या तोंडाशी केशरी किंवा लालसर असतो आणि खालच्या बाजूला पिवळसर असतो. तर कर्नाटकी हापूस आंब्याच्या तोंडाशी त्याचा रंग पिवळसर आणि खालच्या बाजूला हिरवट असतो.

४) कर्नाटकी हापूस आंब्याला जास्त वास नसतो. मात्र देवगड हापूसचा आंब्याचा वास लवकर पसरतो.

५) देवगड हापूस आंब्याचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी आजकाल सरकारकडून याला जिओ टॅगिंग देखल करण्यात येऊ लागले आहे. तसेच जर आपल्याला याद्वारे होणारी फसवणूक टाळायची असेलं तर आंबा नेहमी आपल्या ओळखीच्या विक्रेत्याकडूनच घ्यावा.