तुमचा मोबाईल खरंच वॉटरप्रूफ आहे का? अशाप्रकारे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आजकाल मोबाईल देखील खूप गरजेचा असतो. प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर केला जातो. तरुण पिढी तर मोबाईल शिवाय देखील राहत नाही. त्यांना सतत त्यांचा मोबाईल त्यांच्यासोबत असावा लागतो. परंतु मोबाईल बाळगताना अनेक वेळा त्याबत पाणी सांडले किंवा पाण्यात मोबाईल पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु यासाठी तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ असणे खूप गरजेचे असते. परंतु वॉटरप्रूफ म्हणजे तुमच्या मोबाईलला कितपत संरक्षण मिळते ? आणि ते कसे तपासायचे? हे जाणून घेणे देखील खूप गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ आहे की नाही? आणि किती प्रमाणात आहे? हे त्याच्या IP रेटिंग वरून तपासता येतो. आयपी म्हणजे इंटरेस्ट प्रोटेक्शन यामुळे याचाच अर्थ धूळ आणि पाण्यासाठी बाहेरच्या गोष्टी पासून फोनची सुरक्षा कितपत होते. हे सांगणारे रेटिंग असतं. या आयपी रेटिंगमध्ये दोन अंक असतात. या अंकावरून धूळ आणि पाण्यापासून मोबाईलच्या सुरक्षेची पातळी किती आहे? हे आपल्याला समजू शकते. उदाहरणार्थ जर IP 69 यात पहिला अंक दोन्हीपासून किती संरक्षण देऊ शकतो? हे सांगतो त्याची सर्वोच्च पातळी 6 असते. म्हणजेच मोबाईल पूर्ण संरक्षण दुसरा अंक पाण्यापासून किती संरक्षण मिळू शकते. यामध्ये याची सर्वोच्च पातळी असल्याने तो जास्तीत जास्त काळ राहू शकतो.

तुमचा मोबाईल हा पाण्यापासून तसेच धुळीपासून सुरक्षित असतो. परंतु किती वेळ पाण्यात बुडाला तरी सुरक्षित राहू शकतो. हे महत्त्वाचं आहे. अनेक वेळा पाण्याचे शिंतोडे रिमझिम पाऊस आणि चुकून पाणी सांडलं तरी मोबाईल सुरक्षित राहू शकतो. हे त्याच्या IP रेटिंग वर अवलंबून असते.

IP69 रेटिंग

जर तुमच्या मोबाईलचा हे रेटिंग असेल, तर तुमचा मोबाईल हा पाण्यापासून आणि धुळीपासून सर्वाधिक सुरक्षित समजला जातो. परंतु तो जास्त वेळ पाण्यात ठेवणे देखील योग्य नसते. त्यामुळे मोबाईल खराब होऊ शकतो. जर काही प्रमाणात तुमच्या मोबाईलवर पाणी सांडले किंवा दूर बसली तरी मोबाईल सुरक्षित राहील.

IP68 रेटिंग

हे रेटिंग तुमच्या मोबाईलला पाण्यापासून आणि धुळीपासून सर्व संरक्षण देणारे चांगले रेटिंग मानले जाते.

IP67 रेटिंग

हे रेटिंग तुमचा फोन एक मीटर खोल पाण्यात 30 मिनिटापर्यंत सुरक्षित राहू शकतो. हे दर्शवते तसेच धुळीपासून देखील चांगले संरक्षण दिले जाते.

IPX4

हे रेटिंग असेल तर तुमच्या मोबाईलवर पाण्याच्या शिंतोडे पडले. तरच तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो. परंतु जर मोबाईल जास्त वेळ पाण्यात असेल, तर याबाबत कोणतीही खात्री देता येत नाही.

तुमचा मोबाईल फोन किती वेळ पाण्यात राहू शकतो. किंवा धुळीत राहू शकतो. याची शक्यता IP रेटिंग वरून समजली जात शक्यतो IPX रेटिंग असलेले फोन सर्वाधिक सुरक्षित असतात. परंतु ते पूर्णपणे वॉटरप्रूफ नसतात. ते जास्त काळ पाण्यात राहू शकतात. पण ते सुरक्षित असतीलच याची काही हमी देता येत नाही. चीनमध्ये लॉन्च केलेल्या वन प्लस 13 या मोबाईल मध्ये सर्वोत्तम IP रेटिंग आढळून आले आहे.