घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ? या स्टेप्स करा फॉलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. निवडणुकीसाठी अगदी दोन-तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील निवडणूक आयोग कधन करण्यात आलेले आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या एका मतामुळे आपल्या समाजाचे भवितव्य ठरवले जाते. मतदानाच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. परंतु हा दिवस आपल्या भविष्यातील विकासासाठी असतो.

त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या दिवशी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. दरवर्षी अनेक नवीन मतदार देखील जोडले जातात. आता मतदान करण्यापूर्वी मतदार यादी देखील जाहीर केली जाते. या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येते. तुम्ही अगदी घर बसल्या मतदार यादी तुमचे नाव आहे की, नाही हे चेक करू शकता. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मतदार यादीत नाव असं चेक करा

  • मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • तुम्ही https://electroalsearch.eci.gov.in/ या वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटच्या वरच्या बाजूला serach by details, serach by epic, search by mobile हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  • यानंतर संपूर्ण माहिती भरा. कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.
  • यानंतर मतदार यादीतील तुमचं नावं,epic नंबर अशी सर्व माहिती दिसेल.
  • यानंतर सर्च केल्यानंतर तुमचं नाव दिसत नसेल तर राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.

SMS द्वारे शोधा मतदार यादीतील तुमचं नाव

तुम्ही एसएमएस पाठवून देखील मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही चेक करू शकता.
तुम्ही तुमचा मतदार ओळख क्रमांक टाईप करा.हा एसएमएस 9211728082 किंवा 1920 वर पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळेल.