दिवसभर कोरोना बद्दल बातम्या ऐकुन, भीती निर्माण झालीय, मानसिक दडपण येतय. काय करावं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

समर्पन ध्यान प्रश्नोत्तर | समर्पन ध्यान संस्थेचे प्रमुख शिवकृपानंद स्वामी यांच्या कोरोना लाॅकडाउनच्या काळात मानसिक संतुलन कसे राखावे यावर मार्गदर्शनपर प्रश्नोत्तर स्तंभ आपण चालवत आहोत. आजचा प्रश्न आहे दिवसभर कोरोना बद्दल बातम्या ऐकुन, एक भीती निर्माण झाली आहे, मानसिक दडपण येत आहे. तेव्हा काय करावं? खाली शिवकृपानंद स्वामी यांनी उत्तर दिले आहे.

उत्तर – खरं म्हणजे ना! मला वाटतं बातम्या एक सारख्या ऐकू नये. एकदा ऐका ना! पूर्वी माझ्या लहानपणी, दिवसभर बातम्या नसायच्या. एकदा सकाळी ८ वाजता आणि एक रात्री ८:३० वाजता अश्या काहीतरी , तेवढ्याच बातम्या असायच्या. आणि ते हि रेडिओवर. टीव्ही वगैरे त्या वेळेला नव्हते. तर मला असं वाटतं, टीव्ही वर बातम्या पाहण्यापेक्षा रेडिओ वर बातम्या ऐका .

आता ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे? अंतर आहे. टीव्ही वर ना दृश्य दिसतं. लोक बाहेर निघत आहेत, पोलीस दंडुक्याने त्यांना मारत आहेत किंवा रोगी दाखवत आहेत, दवाखाना दाखवत आहेत. यामध्ये किती लोक मरत आहेत ते आकडे दाखवले जात आहेत. तर कोणतेहि दृश्य आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्या दृश्याचा परिणाम खूप खोलपर्यंत आपल्या चित्तावर होतो आणि आपलं चित्त दूषित होतं

तर त्यात उत्तम मार्ग काय आहे?
आता पहा ना! काही लोक घरात नुसत्या रेडिओ वर बातम्या ऐकतात. टीव्हीवर पाहतच नाहीत. टीव्ही पाहत नाहीत. ते म्हणतात, टीव्ही वर ना, वेळ जातो. त्याला एक सारखं पाहत बसाव लागत. तर मला अस वाटतं कि तसच करावं. एक तर टीव्ही पाहायचा बंद करा. आणि टीव्ही पाहायचा आहे तर तुम्ही तुमच्या फक्त मनोरंजनासाठी पाहा. बातम्यांसाठी रेडिओ ऐका. त्यानी एक फायदा होईल. की तुमच्या चित्तात दृश्य येणार नाहीत. हे पहा! दृश्याचा ना खूप वाईट परिणाम आपल्या चित्तावर होतो. कारण आपण, एक क्षण जरी एखाद वाईट चित्र पाहिल ना, तर त्या वाईट चित्राचा परिणाम आपल्या चित्तावर लगेच होतो आणि खूप खोलवर होतो, आपल्याला कळत नाही, म्हणून माझी सगळ्या आपल्या वाचकांना एक प्रार्थना आहे कि आजपासून टीव्ही पाहायचं बंद करा, खासकरून बातम्यांसाठी हं!
बाकी तुम्ही आपल्या मनोरंजनासाठी पाहा. सिनेमे पाहा, नाटक पाहा, सिरीयल पाहा, चालेल . बातम्या न पाहिल्या योग्य . तुम्ही फक्त बातम्या ऐका, आणि ते ही दिवसभर ऐकायची गरज नाही. खूप जास्त तुम्हाला जिज्ञासा असेल तर दोन वेळा ऐका. एकदा सकाळी आणि एकदा रात्री . म्हणजे त्यामुळे काय होईल, की तुमच चित्त दूषित होणार नाही. कारण काय होत माहिती आहे का? हे चित्त दूषित झाल, दूषित झाल्यानंतर हळू हळू त्याचा आपल्या मनावर परिणाम व्हायला लागतो आणि मग मानसिक तणाव निर्माण व्हायला लागतो.

हे बघा! हा व्हायरस ! एक ना एक दिवस ह्याच वॅक्सीन काढल जाईल . होईल, काही दिवसात होईल, महिन्याभरात होईल. लवकरच होईल. आणि ते झाल्यानंतर हे वॅक्सीन च प्रकरण, हे व्हायरस च प्रकरण संपेल. पण जे परिणाम ह्या २१ दिवसात मनावर होतील, ते परिणाम निघायला जन्मभर सुद्धा कमी पडू शकतो. वाईट परिणाम होऊ शकतील बर का ह्या डिप्रेशन चे !

काय आहे, माणसाला सवय नाही ना अस एकट्यात राहायची. आणि माझ काही नाही. मी तर ४५ दिवसांची १४ अनुष्ठान केली आहेत. म्हणजे १४ वेळा अनुभव आहे, एकट्यात ४५ दिवस राहायचा. पण असा अनुभव सर्व सामान्य माणसाला नाही आहे ना! तुम्ही पहा, हळू हळू मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. हळू हळू होईल ते. जस ८-१५ दिवस जातील ना, नंतर बायको नवऱ्याचा चेहरा पाहते, नवरा बायकोचा चेहरा पाहतो, हे दोघेच जण आहेत. आणि चेहरा एक दुसऱ्याचा पाहतापाहता कंटाळा येईल त्यांना. आणि त्याच्यानंतर ते आपसात चिडचिड करायला लागतील. आपसात भांडण करायला लागतील. कटकटी करायला लागतील.

खूप मानसिक समस्याचे प्रश्न निर्माण होतील. का? आणि दुसर. जर घरातल्या सगळ्यांनाच झालं तर साम्भाळायला कोण? कोणीच सांभाळणार नाही. तर हे वाईट परिणाम ह्या २१ दिवसा नंतर होऊ शकतात. आणि दुसर मग मानसिक रोगी निर्माण होतील आणि नंतर भूतकाळ काढणं खूप कठीण आहे. भूतकाळ कोणीही विसरू शकत नाही. आणि त्या भूतकाळाचे परिणाम जन्मभर आपल्यावर असतात. आणि त्या वाईट आठवणी माणसाच्या जीवनात चित्ताला खूप दूषित करतात . त्याच्या पेक्षा चांगल आहे कि तुम्ही टीव्हीच पाहू नका. तुम्ही फक्त रेडियोच्या बातम्या ऐका आणि टीव्ही मनोरंजनासाठी पहा. ते जास्त चांगल राहील. अस मला वाटतं. आणि दुसर, लहान मुलांना तरी असल्या बातम्यांपासून दूर ठेवा. लहान मुलांच ना मन खूप कोवळं असत. नुसत्या काही गोष्टी ऐकल्या तरी त्याचे परिणाम जन्मभर असतात.

आता मीच सांगतो. मी अगदी लहान होतो. तेव्हा तर रेडियो ही नव्हता, टीव्ही नव्हता, काहीच नव्हत. पण तरी, जे आपसात, आमचे टीचर लोक, मास्तर लोक जे गोष्टी करायचे ना. त्या गोष्टी ऐकून सुद्धा माझ्या वर परिणाम झाला होता. तेव्हा पानशेत धरण फुटल होत आणि लोक त्याच्या गोष्टी करायचे. पुण्याला खूप पूर आला होता,खूप लोकं मेली होती. लोकं तेव्हा नवग्रहिचे यज्ञ करायचे . ते जागोजागी पाहिले. चौका चौकांमध्ये नवग्रहिचे शांत करण्यासाठी यज्ञ चालले असायचे. तर त्याचे परिणाम, आज पर्यंत ,६० वर्ष झाली तरी माझ्या जीवनावर झाले आहेत. आज पर्यंत मला त्या गोष्टी आठवतात. सांगायचं तात्पर्य, तुम्हाला काय वाटतं लहान मुलांना ह्या गोष्टी आठवणार नाहीत? आठवतील ना.
म्हणून अश्या कोणत्याच बातम्या, अश्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या समोर करू नका. त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करू नका. कारण नाहीतर आपण पुढची पिढी मानसिक रोग्यांची निर्माण करत आहोत.
म्हणून आवश्यक आहे, ह्याच्या पासून वाचा.

हे बघा! ‘वाघ म्हंटलं तरी खातो आणि वाघोबा म्हंटलं तरी खातो’. तसा प्रकार आहे ना? तर तसं , हे दिवस तर काढायचेच आहेत. तुम्ही रडून काढा किंवा हसून काढा. काढायचे शेवटी तुम्हाला आहेतच. त्याच्या पेक्षा चांगल आहे, तुम्ही ते हसून काढा, आनंदात काढा. ते जास्त चांगल राहील ना! तर मला अस वाटत कि मुलांना तरी ह्या वातावरणातून दूर ठेवा. ह्या बातम्यांमधून दूर ठेवा. कारण हे जे एक सारख टीव्ही वर दाखवल जात ना त्याचा खूप खोल वर परिणाम त्या लहान मुलांच्या चित्तावर होतो आणि ते त्यांच्या आयुष्यभर राहील. तर असे काही परिणाम होऊ देऊ नका, हीच माझी विनंती आहे.

Leave a Comment