फरशी पुसताना पाण्यात टाका ‘या’ गोष्टी; पाली, झुरळे आसपासही भटकणार नाहीत

Lizard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पावसाळा सुरू झालेला आहे. या पावसाळ्यामध्ये वातावरणातील आद्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आपल्या घराची कानाकोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळ तयार होत असतात. खास करून बाथरूममध्ये त्याचप्रमाणे बेसिनमध्ये झुरळ तयार होतात. त्यांना किती हाकलवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते जात नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमधील पाली सरडे देखील भिंतीवर तसेच फरशीवर आपल्याला फिरताना दिसतात.

जर तुमच्याही घरात सतत पाली, सरडे आणि झुरळे येत असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचे स्वयंपाक घर किंवा बाथरूम स्वच्छ करता त्यावेळी पाण्यात काही गोष्टी टाका. त्यानंतर झुरळे आणि सरडे तुमच्या घराच्या आसपास देखील फिरणार नाहीत.

थंड पाणी

सरडे किंवा पाली यांचे रक्त थंड असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात त्या उष्णता शोधण्यासाठी घरामध्ये येत असतात. थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे ते बाहेर पडत नाही. त्यामुळे तुमच्या घरात जर सरडा किंवा पाली दिसल्या तर त्यांना पळून लावण्यासाठी त्यांच्या अंगावर थंड पाणी टाका.

मीठ आणि लिंबू

तुम्ही जर पाण्यात तीन-चार चमचे मीठ घालून, त्यात लिंबू मिक्स करून हे मी झालेले पाणी तुम्ही स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. या पाण्याने तुम्ही तुमचे किचन तसेच फर्निचर पुसू शकता यामुळे घरात झुरळे येत नाहीत.

नॅप्थलीन बॉल्स

नॅप्थलीन बॉल्सला फिनाईल बॉल असे देखील म्हणतात. हे घरातील किटके लांब राहण्यासाठी वापरले जातात. तुम्ही याचा वापर करून देखील घरातील सरडे आणि पालीपासून सुटका मिळवू शकता.

लसूण आणि कांदा

तुम्ही जर तुमच्या घरातील लसूण किंवा कांदे घराच्या खिडक्या किंवा दरवाजांवर तांगल्या तर पाली घरात प्रवेश नाही. कारण पालींना कांदा आणि लसणाचा वास अजिबात आवडत नाही.

कापूर आणि लवंग

तुम्ही एक कप पाण्यामध्ये पाच ते सहा कापूर घेऊन त्याची बारीक पूड करा. आणि त्यात लवंगाचे तेल घ्याला. आता हे पाणी तुम्ही पाण्यात मिसळा आणि सगळीकडे पुसून घ्या.‌ त्यानंतर झुरळे, कीटक, सरडे हे या मिश्रणाच्या वासाने लांब निघून जातील.