How To Get Rid From Lizard | अनेकांच्या घरात पाली असतात. खास करून किचनमध्ये जास्त प्रमाणात पाली असतात. पाली या घरातील छोटे छोटे कीटक खातात. घरात किचनमध्ये अन्नाचे कण पडलेले असतात, त्यापासून अनेक पाली तयार होतात. परंतु या पालींना कसे पळवून लावावे? हे काही सुचत नाही. आता तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून घरातून पालींना पळवून लावू शकता. दरवाजाच्या किंवा खिडक्यांच्या फटीमध्ये जी जागा असते. त्या जागेतून पाली घरात येतात आणि त्यानंतर घरात छोट्या-छोट्या आणखी पाली तयार होतात. आता या पालींना घराबाहेर (How To Get Rid From Lizard) लावण्यासाठी आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
काळया मिरीचा स्प्रे | How To Get Rid From Lizard
काळया मिरीचे पाणी हे पालींना दूर पळवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही काळया मिरीचा स्प्रे जर घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये मारला, तर पाली नक्कीच पळून जातील. त्याचप्रमाणे दरवाजातून किंवा खिडकीतून पाली आत येतात. त्या ठिकाणी देखील तुम्ही हा स्प्रे मारू शकता.
नेप्थलींच्या गोळ्या
नेप्थलींच्या बॉलचा वापर करून तुम्ही पालींना देखील घराबाहेर काढू शकता. तुम्ही हे बॉल्स घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. जेणेकरून पाली घरातून पळून जाण्यास तुम्हाला मदत होईल.
कांदा आणि लसूण | How To Get Rid From Lizard
कांदा आणि लसणाचा वास खूप तीव्र असतो. जो पालींना अजिबात आवडत नाही. तुम्ही कांदा आणि लसणाचे तुकडे घराच्या कोपऱ्यात ठेवले, त्याचप्रमाणे त्याचा रस करून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रे केला, तर पाली आसपास भटकणार देखील नाही. तुम्ही कांद्याचा रस करून एका बॉटल स्प्रेमध्ये भरा आणि अनेक ठिकाणी मारा. त्यानंतर पाली घरात शिरणार नाही.
अन्न उघडे ठेवू नका
तुमच्या घरात जर अन्न उघडे राहिले किंवा अस्ताव्यस्त इतरत्र पडले, तर त्यामुळे पाली जास्त तयार होतात. त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ ठेवा. कचऱ्याचे डबे व्यवस्थित धुवून ठेवा. ज्यामुळे पाली तुमच्या घराच्या जवळ देखील येणार नाहीत.