Adhar Card, PAN Card प्रमाणेच Voter ID सुद्धा यापुढे Online मिळणार! जाणून घ्या काय प्रोसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रीय मतदार दिनादिवशी निवडणूक आयोगाने मतदारांना एक चांगली बातमी दिली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन याप्रमाणेच आता मतदान कार्डही ऑनलाईन डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे हवे तेव्हा वोटर आयडीची डिजिटल कॉपी डाऊनलोड करता येऊ शकणार आहे.

25 जानेवारी रोजी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य डिजिटल वॉटर कार्डसाठी निवडले गेले आहे. आगामी काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी या निवडणुकांसाठी तेथील नागरिकांना मतदारांना डिजिटल वोटर आयडी मिळण्याची शक्यता आहे.

25 जानेवारी ते 31 जानेवारी मध्ये डिजिटल वोटर आयडीचा पहिला टप्पा पार पडण्याची शक्यता आहे. ज्या मतदारांनी आपले मोबाईल नंबर रजिस्टर केले आहेत, अशा मतदारांना एक फेब्रुवारीपासून डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड करता येणार आहे. पीडीएफ स्वरूपात हे वोटर आयडी मिळू शकेल. त्यावरती क्यूआर कोड सुद्धा असणार आहे. डिजिटल वोटर कार्ड मिळवण्यासाठी आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरून अकाउंट उघडून, डिजिटल वोटर कार्ड डाऊनलोड करता येऊ शकेल.

Leave a Comment